
मनमाड (प्रतिनिधी ) ऑल इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज असोसिएशन, मनमाड फुटबॉल क्लब व ज्युनिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य क्रीडासम्राट आमदार चषक २०२५ राज्यस्तरीय फुटबॉल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज आमदार सुहास(आण्णा) कांदे यांच्या वतीने शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते भव्य उद्घाटन समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

त्या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, फुटबॉल टूर्नामेंट अध्यक्ष हबीब शेख, रहीम पठाण, संजय(दादा) घुगे, लाला नागरे, राजू जाधव, पापा थॉमस, फिरोज शेख, सिद्धार्थ जोगदंड, दिलीप सूर्यवंशी, मुकुंद झाल्टे, लोकेश साबळे, बंटी पठाण, महेंद्र गरुड, बबन फुलवाणी, मोहसीन पठाण, सागर आव्हाड, रितेश सूर्यवंशी, आसिफ पठाण, सचिन दरगुडे उपस्थित होते.
