
नांदगाव (प्रतिनिधी) साप्ताहिक उपदेशक आयोजित १९ वा भव्य वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा निमित्ताने मनमाड येथील संत बाणबा चर्चे फादर प्रवीणकुमार घुले यांना समाज भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. म्हणून आज आमदार सुहास(आण्णा) कांदे यांच्या माध्यमातून शिवसेना मनमाड शहर तर्फे शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते फादर प्रवीणकुमार घुले यांचा संत बाणबा चर्च येथे सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुका उपप्रमुख संजय(दादा) घुगे, लाला नागरे, दिलीप सूर्यवंशी, शहर उपप्रमुख मुकुंद झाल्टे, लोकेश साबळे, अमोल काळे, रितेश सूर्यवंशी, हरीश केकान, आसिफ पठाण, सचिन दरगुडे उपस्थित होते.
