
नांदगाव (प्रतिनिधी ) आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून गिरणा धरण ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येत आहे. सदर योजनेचे सुरू असलेले काम नांदगाव शहरातील बंधू-भगिनींना पाहण्यासाठी पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

विशेषता महिला भगिनींकरिता पाहणी दौरा काढण्यात आला होता यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत संपूर्ण योजनेचे प्रगतीपथावर सुरू असलेले काम स्वतः प्रत्यक्षात जाऊन पाहिले. अनेक वर्षांपासून नांदगाव शहरातील माता-भगिनी तसेच लहान मोठे व्यावसायिक नागरिक पाणीटंचाईला त्रस्त असून 20 – 20 दिवस पाण्याला लागतात ही परिस्थिती ओळखत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सदर 48 कोटी रुपयांची योजना मंजूर करून घेतली.

आज या योजनेचे कार्य प्रगतीपथावर सुरू असून लवकरच योजना पूर्ण झाल्यानंतर नांदगावकरांना नियमित व शुद्ध पाणी मिळणार आहे. गिरणा धरण येथे जॅकवेल, नांदगाव येथील सरकारी दवाखान्याच्या पाठीमागील डोंगरावर जलशुद्धीकरण केंद्र, नांदगाव शहरातील लक्ष्मी नगर व गुरुकृपा नगर येथे जलकुंभाचे कार्य प्रगतीपथावर सुरू आहे.

नांदगावकर माता-भगिनींनी डोळ्याने या पाणी योजनेची सूर असलेले काम पाहिल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला व याप्रसंगी सौ अंजुमताई कांदे व आमदार सुहास अण्णा कांदे यांची भरभरून कौतुक केले व आभारी मानले.

या पाहणी दौऱ्यासाठी प्रवास व्यवस्था तसेच आलेल्या सर्व माता-भगिनींना स्वरूची भोजनाची व्यवस्था करून देण्यात आली. या दौऱ्या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होत्या.
