
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९८६ वा दिवस
भारतातील प्राचीन लेखक ग्रंथकारांनी आपल्या रचनेतून मानवाच्या मनावर मोठा प्रभाव पाडला. परंतु आपल्या ग्रंथावर स्वतःचा नामनिर्देश न करताही त्यांनी ग्रंथ संपत्ती निर्माण केली आणि भावी पिढ्यांसाठी ती ठेवून त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. आपल्या दर्शनांचे, पुराणांचे लेखक कोण आहेत याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. महर्षी वाल्मिकी, व्यास, कपिल मुनी या नावांचा काही ठिकाणी निर्देश होतो. 'तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे परंतु त्याच्या फळावर तुमचा अधिकार नाही' हा गीतेचा महान संदेश त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणला ते गीतेचे खरे अनुयायी होते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १२ श्रावण (नभमास) शके १९४७
★ श्रावण शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५
★ १९०० स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे संस्थापक, कम्युनिस्ट पक्षाचे खासदार, क्रांतीसिंह नाना पाटील यांची जन्मदिन.
★ १९४८ पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
★ १९५७ ‘हिंदूस्थान टाईम्सचे’ संपादक, पत्रकार महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचा स्मृतिदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
