
अंदरसुल, दि. ०१ ऑगस्ट २०२५ – मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, अंदरसुल येथे इंडक्शन प्रोग्रॅम 2025, अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी एकत्रितपणे अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरे करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मान्यवरांनी त्यांच्या कार्याची आठवण करून देत विद्यार्थ्यांना सामाजिक भान आणि राष्ट्रभक्ती यांचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. अरुण भांडगे सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आर. बी. गायकवाड सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सोनवणे सर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका परदेशी मॅडम आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा मस्के मॅडम उपस्थित होत्या.सूत्रसंचालन साक्षी चोबे व देवयानी दांगट यांनी अत्यंत सुंदर व प्रभावीपणे केले. प्रास्ताविक पायल गोणते हिने आत्मीयतेने सर्वांचे स्वागत करत कार्यक्रमाची भूमिका मांडली. अध्यक्षांचे सत्कार करण्याची परंपरा मयूर भागवत सर यांनी पार पाडली.प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील मूल्ये, गुरुंचे महत्त्व, शिक्षणाचे उद्दिष्ट आणि संस्कार यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांना मनापासून दाद दिली.अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे सर यांनी विद्यार्थ्यांना “स्वप्न मोठी बघा, पण ती सत्यात आणण्यासाठी प्रयत्नही प्रामाणिकपणे करा,” असा संदेश दिला.गायत्री धनगे हिने आभार प्रदर्शन करत सर्व मान्यवर, प्राध्यापक वर्ग आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध नाट्य, भाषण, विनोदी खेळ, गायन आणि सांस्कृतिक सादरीकरण सादर केले. संपूर्ण वातावरण आनंद, हास्य आणि टाळ्यांच्या गजरात भारले गेले.कार्यक्रमाच्या शेवटी S.Y. BCS विभागाच्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्यांचे संयोजन कौशल्य, संघटन आणि आत्मीयतेने केलेले काम संपूर्ण कार्यक्रमात दिसून आले.या प्रसंगी मयूर भागवत, मयूर खैरनार, वरद मिसाळ, गणेश आमोदकर, शिवप्रसाद शिरसाट वैष्णवी माळी, प्रिती वल्टे, प्रतीक्षा वाघचौरे, प्रतिभा कोटमे, व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
