
नाशिक रोड ( प्रतिनिधी)दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर काॉलेज,नाशिक.या शाळेत आज शनिवार दि.२६/०७/२०२५ रोजी पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा तथा शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम व पदाधिकारी यांच्या हस्ते सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपपूजन करण्यात आले.

व मा.सौ.सविता कुशारे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पालक-शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेच्या सुरुवातीला विद्यार्थिनीनी ईशस्तवन व कथ्थक नृत्य सादर केले.त्यांना सौ.ऋतुजा नाशिककर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम यांनी दु;खद घटनेचे वाचन करून श्रध्दांजली वाहिण्यात आली.उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी सरांनी अभिनंदनीय बाबीचे वाचन करुन इ.१०वी व १२ वीचे १००% निकाल,विद्यार्थिनींनीसाठी शाळेतील विविध उपक्रमाची व विविध स्पर्धेची माहिती देत,शालेय पदाधिकारी व शिक्षकांचे विविध क्षेत्रात मिळालेले यशाबद्दल सभेत अभिनंदन केले.

तसेच कवी श्री राजेंद्र सोमवंशी सर यांच्या संकल्पनेतून तयार झालेली “अक्षरबाग” या उपक्रमाचेही या सभेत माहिती देण्यात आली.आणि पालकांना काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा तथा शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम यांनी आपल्या पाल्याची उत्सुकता जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले.त्याबद्दल सर्वाचे स्वागत व अभिनंदन करुन प्रास्ताविकातून पालक-शिक्षक संघाची रचनापर माहिती सांगून शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता कसे उंचवता येईल हे उपस्थित पालकांना उदा.तून पटवून दिले.शाळेतील भौतिक सोयीसुविधा अधिक व्यापक स्वरूपात संस्था उपलब्ध करुन देत आहे.तसेच विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी पालकांनीही मोठा हातभार लावणे गरजेचे असून विद्यार्थिनींच्या शिस्त आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे,असे या सभेत पालकांना आवाहन करत ई-लर्निंगच्या माध्यमातून आमच्या शाळेत जे शिक्षण दिले जाते

.ते विद्यार्थिनीच्या अंतर्मनात जाऊन भिडते.अशी शिक्षण देणारी नाशिकमधील आमची ही शाळा आहे.पुढे त्या म्हणाल्या,पाल्य हे एक सुंदर चित्र असून,त्यात एक सुंदर रंग भरुन हा पाल्य आमच्या शाळेत घडविले जाते.इ.५वी व इ.८वीच्या स्काँलरशिपसारख्या माफक दरातील परीक्षेला बसण्यास पालकांनी पाल्यास प्रोत्साहित करावे.तसेच विद्यार्थिनीच्या कलागुणांना वाव देऊन,छोट्या छोट्या गोष्टीची काळजी,स्वच्छतेचे महत्त्व,शिस्तबद्धता निर्माण करून व स्मार्ट गणवेशाने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.आणि त्यातून पूढील ध्येय सहजपणे गाठू शकतात.तसेच आमच्याकडे अनुभवी व उत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थिनीना नेहमीच मिळत असते,असे सांगून शाळेतील विविध कार्यक्रम,उपक्रम,विविध सुविधा,दामिनी पथक,कायदेशीर बाबी, विद्यार्थिनींनीसाठी स्वसंरक्षणाचे धडे,तक्रारपेटी व पालक-शिक्षक संघाचे महत्त्व सांगत,काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिल्या. सौ.रुपाली जोशी मॅडम यांनी इ.१०वी व १२वी उत्तम यश,गणवेश वाटप,शालेय मंत्रीमंडळ यादी वाचन केले.तर गव्हर्निंग कौन्सिल सदस्या सौ.भारती चंद्रात्रे मॅडम यांनी शालेय पदाधिकारी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदनबाबीचे यादी वाचन केले.पालक-शिक्षक संघाकडून मान्यवरांचे व पालकांचे सत्कार करुन इ.१०वी,इ.१२ वीच्या परीक्षेत उत्तम गुण त्याबरोबर विविध स्पर्धेत शिक्षक,नवनियुक्त पदाधिकारी,सेवानिवृत्ती कर्मचारी व विद्यार्थिनीना मिळालेल्या यशाबद्दल पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा तथा शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम यांना तुळशीचे रोप व गुलाब पुष्प देऊन सत्कार केले.व त्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना तुळशी रोप,गुलाबपुष्प व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आले.तसेच शिक्षकांनी घेतलेले शालेय गणवेश प्रातिनिधिक स्वरुपात गरजू विद्यार्थिनीना वाटप करण्यात आले.शिष्यवृत्ती,वाहतूक,सुरक्षा व नवभारत साक्षरता यांची माहिती श्री किरणकुमार मंडळ सरांनी दिली.शालेय शिस्त,साक्षरता आणि संख्याज्ञान मुलभूत वैशिष्ट्यांची शालेय निपूण माहिती गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर यांनी दिली.इतिवृत्त वाचन सौ.मेघना देशपांडे मॅडम यांनी केले.सन २०२४-२५ चे अॉडिट रिपोर्ट व सन २०२५-२६ चे अंदाजपत्रक वाचन श्री शिवाजी चव्हाण सर यांनी केले.नवीन कार्यकारिणीची निवड व अभिनंदन बाबीचे वाचन श्री भिकन मोरे सर यांनी केले. *२०२५-२६ ची नवीन पालक-शिक्षक संघाची कार्यकारिणी* त्यात *अध्यक्षा तथा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे मॅडम,उपाध्यक्षा-सौ.अश्विनी पाटील मॅडम,सचिव-सौ.मेघना देशपांडे मॅडम,सहसचिव- सौ.एजाज बानू राजू पठाण व सौ.प्रतिभा महाजन मॅडम,* यांची निवड करुन विशेष अभिनंदनपर मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे मॅडम यांच्या हस्ते तुळशीचे रोप व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले.ही निवडणूक लोकशाही पद्धतीने सर्वानुमते हात उंच करून घेण्यात आली.विविध समितीची नवीन निवड यादी वाचन गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर यांनी केले.तसेच सभेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व सुविधा,विविध उपक्रम,वर्ग पाठाची व्हिडिओ क्लिप ई-लर्निंगच्या माध्यमातून दाखविण्यात आले. पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ.अश्विनी महेश पाटील मॅडम यांनी यावेळी माझी निवड लोकशाही पद्धतीने करुन सर्वानी माझ्यावर जे विश्वास दाखविले त्याबद्दल सर्वाचे अभिनंदन करुन ही शाळा आपल्यासाठी खूप प्रयत्न करीत असते.म्हणून सर्व पालकांनी पाल्यांना शिस्तीचे व जबाबदारीचे महत्त्व सांगून जागृत व्हावे,असे सांगितले.सौ.एजाज बानू राजू पठाण यांनी यावेळी आपल्या मुलींचे नाते हे मैत्रिणीप्रमाणे असावेत.मुलींच्या आरोग्य व इतर समस्या बाबत पालक म्हणून आपली काय जबाबदारी आहे,त्याबरोबरच शाळेबद्दलचे महत्त्व व अनुभव सांगितले.कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे मॅडम व उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी सर व श्री मिलिंद कोठावदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.आभार ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री मिलिंद कोठावदे सर तर सूत्रसंचालन सौ.दिपाली ठाकूर मॅडम यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब यांचे मार्गदर्शन,शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम,अधिक्षिका सौ.मीना वाळूंजे मॅडम,उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम,गव्हर्निग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.अमृता कवीश्वर मॅडम,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.फलकलेखन सौ.सायली मुळे मॅडम यांनी केले.शेवटी उपस्थित सर्वाना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
