
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवार दि. ०१ ऑगस्ट २०२५ रोजी लोकमान्यटिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. वर्गशिक्षक एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी-ब च्या वर्गाने या कार्यक्रमाची उत्तम तयारी केली होती.सुरुवातीलाच विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कृष्णाजी कडू, विद्यालयाचे प्राचार्य बी. बी. साळुंखे, उपमुख्याध्यापिका एस. डी. थोरात, पर्यवेक्षिका एस. एम. बाबर, एस. एस. पाटील व सेवकवृंद यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी धनश्री मोरे हिने खूप सुंदर पद्धतीने केले. याप्रसंगी ख़ुशी म्हात्रे, रुद्रा धुमाळ, गायत्री मोटे, श्रेयश मंडळे, श्रावणी मंडळे, कौस्तुभ पाटील, राजश्री गायकवाड या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून सांगितली. या प्रसंगी उपशिक्षक आर. जी. शेळके यांनी विविध उदाहरणे देत आपले मनोगत व्यक्त केले.
