
नाशिक ( प्रतिनिधी )१ऑगस्ट हा दिवस जागतिक स्काऊट गाईड ‘स्कार्फ दिन’ म्हणून साजरा केला जातो , ‘स्कार्फ डे’ हा स्काऊट गाईड दिनाचा सन्मान करण्यासाठी स्काऊटिंग गाईडींगची भावना दर्शवितो. “स्कार्फ” हा स्काऊटच्या वचनाची पूर्तता करण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे .यानिमित्ताने आपल्या शाळेत स्काऊट गाईड जागतिक स्कार्फ दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. बरकले सर, शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ कुशारे मॅडम , उपमुख्याध्यापक मा .श्री सोमवंशी सर, पर्यवेक्षिका मा. सौ गवारे मॅडम, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य मा. श्री बागुल सर , मा. चंद्रात्रे मॅडम व ज्येष्ठ शिक्षिका मा. सौ भानोसे मॅडम या उपस्थित होत्या.

स्कार्फ दिनानिमित्त विद्यार्थिनींना संस्थेचे सेक्रेटरी मा.बरकले सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की सर्व गाईडने चांगली कामे करणे व जगण्याची कौशल्य शिकत शिकत समाजासाठी नैतिक पाया विकसित करण्याचे ध्येय विद्यार्थिनींनी ठेवावे,तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ कुशारे मॅडम यांनी मुलींना आपली सामाजिक, नैतिक, वैयक्तिक जबाबदारी ओळखून आपल्या जीवनात चांगले कार्य करून परिधान केलेल्या स्कार्फला एक गाठ मारून ते व्यक्त करावे व अशा अनेक चांगल्या कार्याचा कळस तुम्ही विद्यार्थिनींनी गाठावा असे मुलींना मार्गदर्शन केले.

यावेळी श्रावणी कोठावदे (७अ) या विद्यार्थिनीने स्कार्फ दिनाचे महत्त्व सांगितले, नयन बागुल (८वीक) या विद्यार्थिनीने गाईडचे वचन मुलींकडून म्हणून घेतले वव पूर्वा मोरे( ७अ)हिने गाईडचे नियम सांगितले . गाईड प्रमुख सौ. शिंदे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
