
उसवाड( वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज संचलित डॉ .ना.का.गायकवाड विद्यालय उसवाड येथील विद्यार्थांनी नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे . सदर स्पर्धेचे आयोजन जनता विद्यालय वडाळीभोई येथे करण्यात आले.या स्पर्धा प्रकारात चांदवड व नांदगाव तालुक्यातील एकूण २६ शाळांनी आपला सहभाग नोंदवला .यात विद्यालयातील मृण्मयी बाळासाहेब कासव हिने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले असून तिची जिल्हा स्तरावर निवड झाली. तिच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चांदवड तालुका संचालक डॉ .सयाजीराव गायकवाड ,शालेय समितीचे अध्यक्ष केदु बच्छाव व सदस्य,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार वाघ व सदस्य ,विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत मोरे, पर्यवेक्षक अरुण व्हडगर,सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
