
नाशिक (प्रतिनिधी )क्रीडा विभाग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद मार्फत शालेय व इतर स्पर्धांचे आयोजन विविध गटात करण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2025 26 या वर्षातील नाशिक महानगरपालिका नाशिक तालुका व त्रंबक तालुका या क्षेत्राचे स्पर्धेचे नियोजन शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा संयोजक,एकविध खेळ संघटना प्रतिनिधी यांचे समवेत सहविचार सभेचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृह , गंगापूर रोड, नाशिक येथे करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील , शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष संजय चव्हाण, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय होळकर, तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे , संदीप ढाकणे, महेश पाटील, सर्वेश देशमुख, क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, उत्तरा खानापुरे ,शहा सुरवर , क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर,चित्रा उदार , अजिंक्य दुधारे ,तालुका क्रीडा संयोजक राजेश कासार व क्रीडा संघटना प्रतिनिधी, शारीरिक शिक्षण शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नाशिक जिल्ह्याला क्रीडा मंत्रीपद मिळाल्याबद्दल नामदार श्री.माणिकराव कोकाटे यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला. यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व क्रीडा स्पर्धा यशस्वी आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
