
निगडोळ:(प्रतिनिधी)-शुक्रवार दि.१ऑगस्ट २०२५ रोजी मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ या ज्ञानसंकुलात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरसे डी.डी.होते.मंचावर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एन.जे.कापडणीस,पी.व्ही.गायकवाड मॅडम विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ए.बी.वाघमारे,एस.व्ही बेद्रे उपस्थित होते.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याविषयी ऋतुजा वाघ व भावना भोये या विद्यार्थीनींनी भाषणे दिली.शिक्षक मनोगत कापडणीस एन.जे यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांनी दोन्ही विभूतींविषयी परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षकेतरवृंद व्ही.ए. देवरे व टी.व्ही.भामरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
