
मोहाडी ( बातमीदार): मविप्र संस्थेच्या थोरात विद्यालय मोहाडी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य शरयू भामरे मॅडम व पर्यवेक्षक श्री रवींद्र निकम सर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यातआले.कार्यक्रमाचे अध्यक्ष्यस्थान जेष्ठ शिक्षक श्री प्रदिप जाधव यांनी भूषवले. शालेय गीतमंच व संगीतशिक्षक श्री दिलीप पागेरे सर व विशाल खुळे सर यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंची गीते सादर केली. कु.साक्षी सोनवणे व कु साक्षी घोलप या आठवी ब विद्यार्थिनींनी भाषणे केली त्यांना वर्गशिक्षक उल्केश भोसले यांनी मार्गदर्शन केले.प्रत्येकाने अभिमानाने स्कार्फ परिधान करावा व स्काऊट ध्येयानुसार सदैव इतरांना मदतीसाठी आपण तयार राहावे. असे एक ऑगस्ट जागतिक स्कार्फ दिवस निमित्ताने स्काऊट गाईड समिती प्रमुख श्री हेमराज गांगोडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. लो.टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महान विभूती असून त्यांनी देशासाठी आपापल्या कार्यकाळात स्वार्थ बघितला नाही त्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ शिक्षक प्रदीप जाधव सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. फलकलेखन धनंजय जाधव व कृष्णा जाधव यांनी केले. कु.संस्कृती पवार हिने सूत्रसंचलन तर आभार कु लावण्या आहेर हिने मानले.
