
मखमलाबाद विद्यालयात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲड.बाबुरावजी ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले, पर्यवेक्षक सुनील पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲड.बाबुरावजी ठाकरे यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्राचार्य संजय डेर्ले, पर्यवेक्षक सुनिल पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कु.अश्विनी चव्हाण इ.९वी अ हिने कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. कु.रसिका वायचळे इ.९वीअ हिने महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांचा नाशिक ते कराड असा जिवनपट मांडला.कु.पुर्वा सोनवणे इ.९वीअ हिने कर्मवीर ॲड.बाबूराव ठाकरे यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश झोत टाकला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.अश्विनी चव्हाण तर आभार प्रदर्शन कु.तेजस्विनी वाघेरे,इ.९वीअ हिने केले. या विद्यार्थिनींना बहुमोल मार्गदर्शन व प्रास्ताविक वर्गशिक्षिका वैशाली ठाकरे व सविता आहेर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
