
नाशिक येथील न्यू मराठा हायस्कूलमध्ये मविप्र संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची पुण्यतिथी साजरी करतांना उपस्थित सर्व मान्यवर…..
नाशिक (प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूल नाशिक मध्ये मविप्र संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे होते.व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजनाने करण्यात आली.व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नेहा आहेर ,श्रवण बोंबले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून ज्ञानेश्वर शिंदे यांनी ज्ञान हे जीवन उजळून टाकणारी प्रेरणा आहे. ज्ञान ही समाज सुधारण्याचे आस्था आहे. ही समाज परिवर्तनाची दृष्टी डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती महाराष्ट्रात होऊन गेल्या त्यात नाशिक जिल्ह्यातील वणी गावचे भुमिपुत्र कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म १९ ऑगस्ट १८९० रोजी त्यांच्या आजोळी सुकेणे येथे झाला. त्यांचे भाऊ सखाराम पाटिल हे वणीचे पोलिस पाटील होते. वणी ही रावसाहेबांची कर्मभूमी असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण वणी येथेच झाले. आणि पुढील शिक्षण नाशिकच्या सेंट जॉर्ज हायस्कुल मध्ये झाले. शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय समाज परिवर्तन होणार नाही, हे त्यांनी विद्यार्थी असतानाच जाणले होते. सन १९१२ मद्ये धुळे येथे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे ६ वेे अधिवेशन भरले असतांना दादा या अधिवेशनाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्ष होते., या परिषदेत मिळालेल्या प्रेरणेने त्यांनी नाशिक येथे अधीवेशन भरविण्यास आग्रह धरला आणि 22 डिसेंबर 1913 रोजी नाशिक येथे सातवे अधिवेशन धारचे संस्थानिक श्रीमंत उदोजी महाराज यांच्या अध्यक्षते खाली भरले. याच अधिवेशनात रावसाहेब गणपत दादा मोरे, कीर्तिवान निंबाळकर व दत्ताजीराव भोसले यांच्या सहकार्याने मराठा विद्या प्रसारक या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. यावेळी उदोजी महाराजांनी दहा हजारांची देणगी दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सन 1914 मध्ये उदोजी मराठा वसतिगृह स्थापन केले. रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे, डी. आर. भोसले, गणपत दादा मोरे, विठोबा दादा कानळदकर यांच्या सहकार्याने देणगी जमा करून सन १९२० मध्ये गंगापूर रोडवर 58 एकर जागा मिळवली. आणि याच जागेत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते वसतिगृहाच्या इमारतीचे कोनशिला बसविली. बहुजन समाजासाठी शिक्षणाचा प्रसार केला आणि 6 ऑगस्ट 1936 रोजी नाशिक येथे बहुजन समाजासाठी मराठा हायस्कूल सुरू केले. त्यांचे कार्य बघुन शाहू महाराजांनी संस्थेचे 50 हजारांची देणगी दिली.आणि या देणगीतून 23 एकर जागा मिळवून शाहू महाराज यांच्या हस्ते मराठा हायस्कूल या इमारतीचे भूमिपूजन केले. आणि याच जागेत शिक्षणाची राजधानी म्हणून नावारूपाला आलेली भव्य अशी वास्तू आज उभी आहे. आजमितीस संस्थेच्या जिल्हाभर प्राथमिक, माध्यमिक, कला, वाणिज्य, विज्ञान महविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय यासारखे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या अनेक शाखा आहे हे सांगितले. सुत्रसंचालन वैष्णवी खेलूकर ,चैतन्या चौधरी यांनी केले.आभार मधुरा आहेर मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
