
श्रीमान टी.जे.चौहान माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त इयत्ता आठवीच्या वर्गांची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. प्रथम माननीय मुख्याध्यापिका सौ.उज्वला माळी, व स्पर्धेचे परीक्षक श्री शिवाजी मोरे यांनी प्रतिमा पूजन केले. या निमित्ताने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम फेरीतून अंतिम फेरीसाठी आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र वक्तृत्वातून मांडले. स्पर्धेत प्रथम क्रमांक- समृद्धी राजेंद्र जाधव, आठवी अ , द्वितीय क्रमांक – अनुजा रवीकिरण डोमाळे, आठवी ब तृतीय क्रमांक- ईश्वरी सुशांत सारंगधर आठवी अ यांनी पटकावला तर उत्तेजनार्थ बक्षीस श्वेता बबन भोरगे आठवी क हिला मिळाले. माननीय मुख्याध्यापिका व परीक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका ,पर्यवेक्षक व इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
