
लेखक- शंकर नामदेव गच्चे( एम. ए. बी. एड.) नांदेड
मोबाइल नंबर -८२७५३९०४१०
अण्णा भाऊच्या नावावर प्रचंड साहीत्य असूनही ते उपेक्षित आहेत.त्यांची दख्खल भारतीय समाज घेत नाही.साहीत्यातील अनेक कला कृतींचा आविष्कार करूनही ते उपेक्षित राहीले.रशियायाने त्याना सन्मान दिला पण भारतात माञ ते उपेक्षितच आहेत. त्यांच्या कार्याची ओळख थोडक्यात आज आपण करून घेऊ.अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १- आॕगष्ट- १९२० रोजी वाटेगाव तालुका वाळवा जि.सांगली येथे एका कामगार कुंटुबात झाला.अण्णा भाऊ साठे हे मराठी लेखक,समाजसुधारक,प्रसिध्द कादंबरीकार,लोकनाटयाचे जनक,सुप्रसिद्ध लोकशाहिर होत.१-आॕगस्ट-१९२० रोजी अण्णा भाऊंचा जन्म झाला.

१-आॕगस्ट ही जन्म तारीख आहे.आमच्या जन्म तारखा खर्या नाहीत आमच्या जन्म तारखा अंदाजे टाकलेल्या आहेत.परंतु अण्णा भाऊची जन्म तारीख ही खरी आहे.त्याच कारण अस आहे की ज्यावेळी वालुबाई अण्णा भाऊना घेऊन शाळेमध्ये गेल्या आणि मास्तरांनी विचारलं की वालुबाई याची जन्म तारीख काय टाकू? तेव्हा वालुबाई म्हणाल्या,”मला जन्म तारीख माहीत नाही परंतु त्या दिवशी कोणी तरी मोठा माणूस वारलेला होता.सगळ्या शाळा बंद होत्या,सगळे आॕफीस बंद होते,रेडीओवर बातम्या चालू होत्या आणि जिकडे तिकडे ही चर्चा चालू होती.मग १ आॕगष्ट १९२०ला कोणाचा मृत्यू झाला होता? लोकमान्य टिळकांचा १ आॕगष्ट १९२० ला मृत्यू झाला

म्हणून मास्तरांनी १ आॕगष्ट १९२० ही तारीख टाकून दिली.आज त्याला ९९ वर्ष पूर्ण झालेली आहेत.त्यांच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत १८ जुलै १९६९ पर्यंत अण्णा भाऊना ४९ वर्ष आयुष्य मिळालं.या ४९ वर्षाच्या आयुष्यात अण्णा भाऊनी काय काय केल हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. वालुबाई अण्णा भाऊना शाळेमध्ये घेऊन गेल्या.त्यावेळी ६ वर्षाला शाळेत दाखल करत नव्हते.७ वर्षाला,८ वर्षाला,९ वर्षाला अस दाखल करायचे.अण्णा भाऊ आपल्या आईला नेहमी म्हणायचे,”आई मी इतका मोठा होईन..,.इतका मोठा होईन की मला माझ्या समाजाच काहीतरी भल्ल करायचय.”म्हणजे वयाच्या इतक्या छोट्या वयात अण्णा भाऊने हे स्वप्न आपल्या आईकडे व्यक्त केलेल होत.अण्णा भाऊना शाळेमध्ये दाखल केल आणि अण्णा भाऊ त्या दिवशी शाळेमध्ये बसले त्यांना १ ते १० पर्यंत त्यांच्या मास्तरांनी काढून दिल.बोर्डावर आणि त्यांच्या पाटीवर आणि सांगितलं याला गिरवत बस १ पासून ते १० पर्यंत अण्णा भाऊ दिवसभर गिरवत बसले.दुसऱ्या दिवशी शाळेत गेले तेव्हा मास्तरांनी सांगितलं की काल जे तुला दिल होत ते आज काढून दाखव.अण्णा भाऊला काल जे दिल होत ते जमलं नाही म्हणून मास्तरांनी छेडी फेकून मारली,कोणतेही मास्तर विद्यार्थ्यांना छेडी मारतात.चूकल्यावर मास्तरांनी मारायला पाहीजे.पण अण्णा भाऊना ती गोष्ट खटकली की,मास्तरांनी मला छेडी फेकून का मारली?मास्तरांनी छेडी फेकून यासाठी मारली की मास्तर ब्राम्हण होते.अण्णा भाऊ अस्पृश्य होते.मास्तरांनी जर अण्णा भाऊना जवळ घेऊन मारल असत आणि त्यांचा स्पर्श झाला असता तर मास्तराला शिवा शिव झाली असती.मास्तर विटाळले असते म्हणून मास्तरानी छेडी फेकून मारली.अण्णा भाऊना त्या गोष्टीचा खुप अपमान वाटला म्हणून अण्णा भाऊनी त्या दिवशी शाळा सोडून दिली.अण्णा भाऊ शाळेच्या बाहेर पडले आणि पुन्हा शाळेमध्ये गेले नाहीत.आणि वयाच्या १२ व्या वर्षी अण्णा भाऊ वडीलांसोबत मुंबईला गेले. मुंबईला ते जमेल ते काम करू लागले.मुंबईत पोटासाठी वनवन भटकत असताना हमाल,बुटपाॕलीशवाला,घरगडी,हाॕटेलबाॕय,कोळसेवाहक,डोअरकीपर,कुञ्याल सांभाळणारा,मुलांना खेळवणारा,खाणकामगार,उधारी वसुली करणारा,ड्रेसिंगबाॕय अशी नाना प्रकारची काम केली यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपणाला कल्पना येईल.अनेक काम केली.वयाच्या २० व्या वर्षी अण्णा भाऊची अनेक कम्युनिस्ट लोकांशी ओळख झाली.त्यांच्या सोबत ते बसू लागले.त्यांच्या चर्चेत सहभागी होऊ लागले.अस करता करता अण्णा भाऊने एक गीत लिहील आणि ते गीत त्यानी म्हणून दाखवल कमुनिष्ट लोकांना ते गीत खुप आवडलं.आणि मग सगळे अण्णा भाऊवर प्रेम करायला लागले.आणि तेथूनच सगळे त्यांना अण्णा अण्णा म्हणू लागले.

कमुनिष्टामध्ये काही जुनी मंडळी होती ती त्यांची काही गाणी म्हणायचे आणि त्यांच्या मागे अण्णा भाऊ गीत म्हणायचे १९४०-१९४२ हा जो दोन वर्षाचा कालावधी आहे.पार्टीमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीमागे गीत म्हणने.छोटया छोट्या गीत रचना करणेअशा प्रकारचा होता. दिड दिवस शाळेत जाऊन अण्णा भाऊने ३५ कादंबऱ्या,८ पटकथा,३ नाटके,१ प्रवास वर्णन,१३ कथासंग्रह १४ लोकनाटय,१० प्रसिध्द पोवाडे व १२ उपहासात्मक लेख,स्टॕलिनग्राडचा पोवाडा,बर्लिनचा पोवाडा,चीनी क्रांतीवरील चीनी जनांची मुक्तीसेना हे गौरवगान आणि डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांवरीला गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुन गेले भिमराव’हे गाणे,अशी अनेक गाणी,कवने,पोवाडे अण्णा भाऊनी रचली.त्यांनी आपल्या गाण्यांतून,पोवाड्यातुन अनेक सामाजिक राजकीय प्रश्नांना,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले.एवढं प्रचंड लिखाण दिड दिवस शाळेत जाऊन ऐवढ प्रचंड लिखाण कस केल हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो ?१९३२ ते १९४० हा जो ८ वर्षाचा कालावधी आहे या काळात त्यांना चिञपट पाहण्याचा छंद लागला.या छंदानेच त्यांना साक्षर केले.अण्णा भाऊ कामाला गेले की येताना चिञपटाच्या पाट्या,रस्त्यावरील दुकानाचे बोर्ड,बसच्या पाट्या,रेल्वेच्या पाट्या,आॕफीसचे बोर्ड वाचन करणे व राञी आपल्या पार्टीतील कार्यकर्त्यांकडून अ ब क ड,काना,माञा शिकण हा त्यांचा कार्यक्रम होता. अण्णा भाऊ कुठे शिकले?अण्णा भाऊ समाजाच्या शाळेत शिकले.म्हणजे औपचारिक शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे हे अण्णा भाऊच्या वाटयाला आल नाही.अण्णा भाऊला शिक्षणापासून कुणी तोडल?मास्तरानी.मास्तरांनी का तोडून टाकल ? कारण मास्तर हे उच्चवर्णीय होते आणि अण्णा भाऊ हे अस्पृश्य होते.म्हणून मास्तरानी अण्णा भाऊला शाळेच्या ज्ञानापासून दूर केल आणि मग अण्णा भाऊ समाजात माणसे कसे वागतात कसे ऐकमेकांना फसवतात.कसे ऐकमेकांवर प्रेम करतात,कसे एकमेकांच्या सुख दुःखासाठी धावून जातात,एकमेकांना मारायला उठतात,समाजाच निरीक्षण करून वास्तव चिञण अण्णा भाऊने आपल्या साहीत्यातून केल.त्यानंतर अण्णा भाऊनी काय काय बदल केले?अण्णा भाऊनी आपणाला काय काय सांगितलं हे आपण समजून घेतल पाहिजे.आपल्या देशात अनेक शाहीर झाले.पठ्ठे बाबुराव फार मोठे शाहीर होते,शाहीर अमर शेख होते,शाहीर वनमाळी होते,अगोदरच्या शाहीरांची परंपरा काय होती?नाटक आहे,तमाशा आहे,गीत आहेत,पोवाडे आहेत कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात करताना काय म्हणायचे पूर्वी वंदन माझे गणपती राया,म्हणजे गणपतीला वंदन करून,शंकराला वंदन करून,पार्वतीला वंदन करून आपल्या देशामध्ये तमाशात पोवाडे म्हणण्याची प्रथा होती.अण्णा भाऊनी ही प्रथा मोडून टाकली.अण्णा भाऊनी ही प्रथा नाकारली आणि त्यांनी सुरूवात केली”प्रथम नमो मायभूच्या चरणा,छञपति शिवबाच्या चरणा स्मरूनी गातो कवना”.अण्णा भाऊनी इथून सुरूवात केली.म्हणजे अण्णा भाऊ या देशातले दुसरे शिवशाहीर आहेत.पहीले शिवशाहीर राष्ट्रपिता जोतीराव फुले,जोतीराव फुल्यानी पहीला पोवाडा शिवाजी महाराजांवर लिहीला.”कुलवाडी भूषण छञपति शिवाजी महाराज”हा १५ ते २० पानांचा आहे.अण्णा भाऊनी मातृभूमीला वंदन केल.या मायभूमीचा सर्वात मोठा राजा,परिवर्तनवादी राजा,या देशाची अस्मिताअसलेला,या देशाची शान असलेला छञपति शिवाजी महाराजांना वंदन करून अण्णा भाऊनी गीत म्हटली.या देशात अनेक लोक गीत म्हणतात पण त्यांची जयंती साजरी होत नाही.अण्णा भाऊंची जयंती का साजरी होते ?अण्णा भाऊनी हा बदल केलेला आहे.समाजाला बदण्यासाठी अण्णा भाऊनी आईला आश्वासन दिलेल होत आई मी खूप मोठा होणार आहे पण मास्तरामुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आल नाही म्हणून अण्णा भाऊनी उरउरीत आयुष्य एकलव्या प्रमाणे रस्त्यावर शिक्षण घेऊन बदलाचा विचार मांडला.१५ आॕगष्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला.देशातले उच्च वर्णीय लोक नाचू लागले,त्या लोकांनी लाईटींग केली,फटाके वाजवले,गुलाल उधळला स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होऊ लागला.दुसरीकडे अण्णा भाऊनी १६ आॕगष्ट १९४७ ला मुंबई विधान भवनावर स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला.त्यासाठी पञक काढली,मुंबईत जागोजागी मोर्चाची पोस्टर लावण्यात आली.मग अण्णा भाऊना त्यांच्या पार्टीतील लोक म्हणाले,अण्णा भाऊ देशातले हजारो लोक मेलेत स्वातंत्र्यासाठी आणि तुम्ही स्वातंत्र्याचा निषेध करता.तुम्ही स्वातंत्र्याच्या विरोधात आंदोलन करता ते तुम्हाला करता येणार नाही.पोलिस प्रशासनान विरोध केला.पार्टीतून तुम्हाला काढून टाकण्यात येईल असा त्यांना इशाराही देण्यात आला.अण्णा भाऊनी जर मोर्चा काढला तर त्यांना पार्टीतून हाकलण्यात येईल.अण्णा भाऊ म्हणाले,”मला पार्टीतून हाकलल तरी मला त्याची पर्वा नाही परंतु मी मोर्चा काढणारच.आपल्या विचारांवर ते ठाम राहीले आणि १६ आॕगष्ट १९४७ ला पाच हजार लोकांचा भव्य मोर्चा काढला,पडत्या पावसात मोर्चा काढला.त्यावेळी मुंबईला जेवढा पाऊस झाला तेवढा पाऊस मुंबईला झाल्याची नोंद इतिहासात नाही .आचार्य अञे यांनी त्यांच्या जीवन चरिञात लिहून ठेवलय.आचार्य अञे अण्णा भाऊंचा मोर्चा पाण्यासाठी गेले होते.अण्णा भाऊचा मोर्चा २ की.मी.लांब आणि या मोर्चाची घोषणा होती.”ये आझादी झुटी है,देश की जनता भुुखी है! अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यिक, लोक शाहीर होते पण त्यांनी हिंदीतून का घोषणा दिली ? त्याचं कारण असं आहे, स्वातंत्र्याचा मामला देशव्यापी आहे म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी हिंदीतून घोषणा दिली “ये आझादी झुठी है देश कि जनता भुखी है!”अण्णा भाऊ साठे म्हणतात,”१९४७ ला मिळालेल स्वातंत्र्य हे खोट आहे?ते कस खोट होत?अण्णा भाऊनी का मोर्चा काढला ?याच कारण अस होत या देशात स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिल.या देशात पोटजातीसह मिळून १० ते १२ हजार जाती आहेत.या देशात कोणतीच निवडणूक न होता पंडीत नेहरू देशाचे पंतप्रधान झाले.त्यावेळी देशात १४ प्रांत होते १४ ही प्रांतांचे मुख्यमंत्री ब्राम्हण होते.या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडल हजारो लोकांनी पण सत्ता माञ एकाच community च्या हातात गेली पंडीत जवाहरलाल नेहरू कसे झाले पंतप्रधान? त्यावेळी देशात काँग्रेस पक्ष्याची फार मोठी चळवळ होती आणि काँग्रेस पक्ष्यात ९०% लोक ब्राम्हण होते.त्यावेळी देशात १४प्रांत होते.काँग्रेस वर्किंग कमीटी ठरल होत की १४ प्रांतांचे मुख्यमंत्री ज्यांना मतदान करतील तो देशाचा पंतप्रधान होईल.पंतप्रधान पदासाठी पंडीत जवहारलाल नेहरू व सरदार वल्लभाई पटेल उभे होते. सरदार पटेलांना १४ पैकी १२ मत पडली व पंडीत नेहरूना १ च मत पडल तेही त्यांचच एकजण मतदानास गैरहजर राहीला.काँग्रेस वर्कींग कमिटीच्या निर्णयानुसार सरदार वल्लभाई पटेल देशाचे पंतप्रधान होणार होते.पंडीत नेहरूना पंतप्रधान होण्याची घाई झाली होती पण निवडणूक हारले होते.मग ते महात्मा गांधीकडे गेले आणि महात्मा गांधीला म्हणाले,”मला जर पंतप्रधान केल नाही तर मी काँग्रेसला फोडतो.मग इंग्रजांना बहाना मिळेल कोणत्या काँग्रेसला सत्ता द्यायची”.गांधीजी नेहरूच्या झाशात आले आणि त्यांनी सरदार वल्लभाईना माघार घ्यायला लावली.आणि पंडीत नेहरू पंतप्रधान झाले.(संदर्भ -राजिव दिक्षित यांचे internet वरील speech ) इंग्रजांना या देशातून जायचं होत मग सत्ता कुणाच्या हातात द्यायची.अडाणी लोकांच्या हातात तर सत्ता देता येत नाही.मग शिकलेले कोण आहेत ?ब्राम्हण कारण इतर समाजाला शिकायला बंदि होती.या देशात जे राजे झाले रजपूत राजे झाले,धनगर राजे झाले,मराठे राजे झाले या राजांना सुध्दा शिकायला बंदि होती.ब्राम्हणांनी काय म्हटलय तुम्हाला शिकायची गरज नाही तुम्ही राजे राहा.ज्ञानाच जे काम आहे ते आम्ही करतो.ग्रंथ वाचायच असेल,पौर्णिमा सांगायची असेल,अमावस्या बघायची असेल.ज्ञानाच्या, शिक्षणाच्या काय काय भानगडी आहेत त्या आम्ही करतो.तुम्ही कशाला त्या लफड्यात पडता.पुस्तक वाचा,शाळेत जा.तुम्ही राजे रहा.या देशात अनेक राजे होते,मराठा राजे होते,रजपूत राजे होते,धनगर राजे होते,माळी राजे होते म्हणजे अनेक जातीचे लोक राजे होते.ब्राम्हणांनी सांगितलं त्यांना की तुम्हाला शिकायची गरज नाही.या देशातील लोकांना त्यांनी काही काम ठरवून दिली होती.म्हणून काय झाल तर या देशात राजांना सुध्दा शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणून डाॕ.बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या ३०० व्या जयंती मध्ये भाषण करताना बदलापूरला म्हणतात,”जर कदाचित शिवाजी महाराजांना उच्च शिक्षण मिळाल असत तर जगाचा इतिहास बदलला असता पण तस झाल नाही १९४७ ला सत्तेच हस्तांतरण म्हणजे power of transfer झाल त्यावर पंडीत जवहारलाल नेहरू,लार्ड मांउट बॕटन आणि एडविना मांउट बॕटन यांंच्या सह्या आहे.म्हणून अण्णा भाऊ साठे म्हणाले,देशाच्या सगळ्या माणसांच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हा त्या देशाची सत्ता राहील.या देशामध्ये मराठा आहे,धनगर आहे,जाट आहे,रजपूत आहेत,गुजर आहेत,रेड्डु आहैत.या देशात जाती पोटजातीसह १० ते १२ हजार जाती आहेत.या १० ते १२ जातींच्या हाती जेव्हा सत्तेची सूञ येतील,सार्वभौम सुञ येतील तेव्हाच देश स्वतंत्र झाला अस म्हणता येईल. १९४७ ला perticular एकाच community च्या हातात सत्तेची सूत्र गेली.अर्थातच हे जे स्वातंत्र्य आहे ते खोटआहे.अण्णा भाऊ अस का म्हणाले तर याची सुरुवात राष्ट्रपिता जोतीराव फुलेंनी केली होती.जोतीराव फुलेंकडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे गेले आणि जोतीरावांना म्हणाले,”तात्यासाहेब हे जे स्वातंत्र्याच आंदोलन चाललेल आहे तर या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा त्यामुळे या आंदोलनला मोठी व्याप्ती येईल”.तेव्हा जोतीराव फुले म्हणाले,”अहो रानडेजी कुणाच स्वातंत्र्य जर देश स्वातंत्र्य झाला तर त्या देशाची सत्ता,त्या देशाच प्रशासन कुणाच्या ताब्यात जाणार ,तुमच्या ताब्यात जाणार ते मराठ्यांच्या ताब्यात राहणार नाही,ते धनगरांच्या ताब्यात राहणार नाही,ते रजपूतांच्या ताब्यात नाही,ते जाटांच्या ताब्यात राहणार नाही महार आणि मांग तर फारच लांब होते म्हणून जोतीराव फुले म्हणाले,”असू द्याना इंग्रज आहेत म्हणून शाळा निघायल्यात,इंग्रज आहेत म्हणून रेल्वे सुरू झाली,पोष्ट आॕफीस सुरू झाले,इंग्रज लोक ज्ञानी आहेत,राहू द्याना ते सुधारणा करू लागलेत,सामान्य लोकांना शिकायला संधी देऊ लागलेत,स्ञीयांना शिकायला संधी देऊ लागलेत राहू द्या त्यांना नको स्वातंत्र्य तुमचं जे स्वातंत्र्याच म्हणनं आहे ते फसव आहे अस म्हणून जोतीरावांनी महादेव गोविंद रानडेना वापस पाठवलं आणि महात्मा फुले बहुजन समाजाला म्हणाले “जोपर्यत या देशात इंग्रज आहेत तोपर्यंत संधी आहे जल्दी करा आणि ब्राम्हणांच्या गुलामीतून मुक्त व्हा!” त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांकडे लोकमान्य टिळक गेले आणि म्हणाले,””राजे तुम्ही जर या स्वातंञ्याच्या आंदोलनात सहभागी झालात तर या स्वातंञ्याच्या आंदोलनाला गती येईल.”तेव्हा शाहू महाराज म्हणाले,”तुम्ही माझ्या सारख्या राजाला जमू देत नाही,शुद्र म्हणून अपमान करता देश जर स्वातंञ झाला तर माझ्या बहुजन समाजाच काय होईल?”म्हणजे शाहू महाराजांनी स्पष्ट नकार दिला टिळकांना. त्यानंतर डाॕ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत न्यूयार्क मध्ये कोलंबिया विद्यापीठात शिकायला होते तेव्हा पंजाबचा सिंह लाला लजपतराय बाबासाहेबाना म्हणाले,”बाबासाहेब भारतात स्वातंंञ्याच जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा!”तेव्हा बाबासाहेब म्हणाले,”लालाजी भारत देशात जी ब्रिटिशांची राजवट आहे त्यामध्ये ब्रिटीशांच्या राजवटीत आम्हाला तुमच्या बाता सहन होत नाहीत आणि तुमच जर राज्य आला तर तुम्ही आम्हाला लाथा घालाल म्हणून तुमच आंदोलन आम्हाला नको.” म्हणजे जोतीराव फुले स्वातंञ्याच्या आंदोलनाला नकार देतात,राजर्षी शाहु महाराज स्वातंञ्याच्या आंदोलनाला नकार देतात आणि बाबासाहेब आंबेडकर स्वातंञ्याच्या आंदोलनाला नकार देतात ही ओळ हाच धागा पकडून अण्णा साठेनी १६ आॕगष्ट १९४७ ला मोर्चा काढला.ही ओळ हा संदर्भ अण्णा भाउनी कुणाचा पकडला तर राष्ट्रपिता जोतीराव फुलेंचा. (वरील तिनही प्रसंगाचा संदर्भ -“स्वातंञ्याची दोन आंदोलने -लेखक- डी.आर.ओहोळ) संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतअण्णा भाऊच फार मोठ योगदान आहे.अण्णा भाऊंच्या जीवनाचे चार टप्पे आहेत.पहीला टप्पा आहे १९२० ते १९३२ दुसरा टप्पा आहे १९३२ ते १९४२ तिसरा टप्पा आहे १९४२ ते १९६० आणि चौथा टप्पा आहे १९६० ते१९६९. अण्णाभाऊ साठे जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बुद्धाची शपथ हे पुस्तक लिहतात. त्यानंतर मृत्यू कडून जीवनाकडे हे पुस्तक लिहायला घेतात याचा अर्थ काय आहे तर माझा पुनर्जन्म झाला आहे हे अण्णाभाऊ साठे यांना सांगायचं आहे. हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 ला दीक्षा घेतल्यानंतर म्हणतात माझा पुनर्जन्म झाला आहे. म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जेव्हा कळाले तेव्हा अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी पुस्तक लिहिण्यासाठी घेतल मृत्यू कडून जीवनाकडे. अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या शेवटच्या दिवसात फार कष्ट सहन करावे लागले, तत्कालीन सरकारने त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन अटक केली, अमळनेरच्या तुरुंगात त्यांचा छळ केला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना सलग ५ दिवस अन्न न मिळाल्यामुळे उपासमारीने त्यांचा १८ जुलै १९६९ ला मृत्यू झाला. आज त्यांची जयंती साजरी करत असताना आम्ही हा इतिहास विसरता कामा नये. कारण जे लोक इतिहासातून बोध घेत नाहीत ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यांच्या त्यांचा इतिहास नष्ट केला जातो.यासाठी आम्ही चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आजही आपला समाज अज्ञानी,अडाणी गावकुसाबाहेर राहणारा अशिक्षित, वंचित, शोषित आहे. त्यांच्यासाठी शिकलेल्या लोकांनी काम करणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण शिकलेले लोक बेईमान निघाले ते आपल्या अज्ञानी, अडाणी समाजाला वाऱ्यावर सोडून शहरात जाऊन राहू लागले. शिकलेल्या लोकांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या गरीब अज्ञानी, अडाणी समाजाला सोबत घेऊन चाललं पाहिजे. ही प्रत्येक शिकलेल्या माणसाची जबाबदारी आहे. त्यांच्या जयंती निमित्त त्याना कोटी कोटी प्रणाम
