
नांदगाव (वार्ताहार ) व्ही .जे हायस्कुल नांदगाव या शाळेत १ ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डॉ. जोगेश्वर नांदूरकर होते. तर प्रमुख वक्ते प्रा .श्री. सुरेश नारायणे होते.व्यासपीठावर श्री. भास्कर मधे, श्री. प्रविण अहिरे शालेय पंतप्रधान कु हिरे व कु बोरसे आदी मान्यंवर उपस्थित होते.

उपस्थितांच्या हस्ते लोकमान्य टिळक व श्री. आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कु . मृण्मयी दडंगव्हाळ , सौम्या कवडे , खुशी कायस्थ , प्रेरणा सोणवणे विशाखा दुसाने यांनी लो.टिळक व आण्णा भाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. बोरसे मृणाल या विद्यार्थ्यांनीने स्वागतगीत म्हटले . प्रमुख अतिथी यांचा परिचय श्रीमती दिपाली सांगळे यांनी करून दिला. प्रमुख वक्ते प्रा .श्री. सुरेश नारायणे यांनी सध्याच्या पिढीला उपयुक्त असे प्रबोधनपर विचार मांडून टिळकांच्या जन्मापासून स्वराज्य स्थापनेपर्यतंचा इतिहास , संघर्ष अतिशय सोप्या पद्धतीने मांडला जणु आपण इतिहास कालीन जीवन प्रत्यक्ष बघत असल्याचा भास सर्वांना झाला त्यांचे स्पष्ट निर्भिड विचार व डेक्कन इज्युकेशन ची स्थापना पर्यतंचा इतिहास अतिशय तन्मयतेने त्यांनी मांडलेला न माहिती असलेला इतिहास कथन करून सर्वांची मने जिंकली.

दुपार सत्र वक्ते श्रीमती पूर्ती देवरे होत्या यावेळी कु.गिरीजा वाघमारे हिने सूत्रसंचालन केले , तर कार्यक्रमाचे आभार प्रविण आहिरे , व क्षश्री. सुरेश नवसारे यांनी मानले. शाळेचे मुख्याध्यापक एल.एन.ठाकरे व उपमुख्याध्यापक डॉ.नांदूरकर यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. दुपार सत्रातील व्यासपिठावर श्री. पाटील गुलाब , श्रीमती रुपाली झोगेकर , श्री. नवसारे सुरेश आदी मान्यवर उपस्थित होते अशा प्रकारे. उत्सहाने. कार्यक्रमाची सांगता झाली .
