
नांदगाव (प्रतिनिधी)- मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने त्यांचे प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका ज्योती काळे, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा विषय आपले मनोगत व्यक्त केले. उपशिक्षिका श्रीमती गितांजली मोरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्त्वाचे नेते, विचारवंत आणि समाज सुधारक होते हे सांगितले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक थोर लोकशाहीर , समाज सुधारक व प्रतिभावंत साहित्यिक होते हे सांगितले. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. याप्रसंगी सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
