
नाशिकरोड:-(प्रतिनिधी ) पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांना स्मृतिदिनी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जन्मदिनी अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थी धन्वंतरी गायधनी, वेदिका आडके, ईश्वरी आडके, मानसी वाघचौरे, श्रुती आडके, लावण्या सानप यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यावर विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक अरुण पगार यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख कैलास लहांगे यांनी निवेदन केले.फोटोओळी:- लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करताना नासाका माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचारी.
