
टाकळी बुद्रुक (प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय टाकळी बुद्रुक तालुका नांदगाव या विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते प्रतिमापूजन झाल्यानंतर विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी अनुजा योगेश पवार व इयत्ता आठवीची विद्यार्थिनी विद्या पवार यांनी आपले मनोगत मांडले.अध्यक्षीय भाषणात “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच “अशी सिंहगर्जना करणारे लाल- बाल- पाल या त्रिकुटा पैकी एक होते. लोकमान्य टिळक हे खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक महत्त्वाची शिलेदार होते तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना “दलित साहित्याचे जनक” म्हणून ओळखतात तसेच त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सक्रिय योगदान दिले होते. अण्णाभाऊ साठे यांनी कसलीच विषमता नसलेला समता मुलक समाज निर्माण व्हावा ही वैश्विक भूमिका आपल्या साहित्यातून मांडली तसेच त्यांच्या कार्याच्या रूपाने आजही लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठी हे अजरामर आहेत त्यांच्या कार्याला अभिवादन करून अभिवादन करून कृतज्ञतापूर्वक वंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षिका पी.सी राजपूत यांनी केली समारोप उपशिक्षक व्ही .ए .कवडे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
