
मुळ डोंगरी (प्रतिनिधी)आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी.”श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळ डोंगरी , ईश्वराने कोकिळेला कंठ अन् मोराला पिसारा दिला. तसे मानवाला बुद्धी आणि कलेचे वरदान दिले कला शिकवून येत नाही ती उपजत असावी लागते तिला प्रोत्साहन, मार्गदर्शन लाभावे लागते पण आपल्या अलौकिक प्रतिभेतून तो कलावंत सुंदर कला विश्वाची निर्मिती करतो अशीच एक अभिजात वकृत्वाची कला लाभलेले लोकोत्तर लोकनेते श्री श्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती याप्रसंगी लाभलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राठोड साहेब व सचिव सिद्धांत दादा राठोड व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम यांनी श्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती बागुल मॅडम यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री सांगळे सर यांनी श्री यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते त्यांनी केलेली लोकसेवा याचे वर्णन सुंदर शब्दात केले. अशाप्रकारे श्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
