
नांदगाव=(प्रतिनिधी ) मविप्र संचलित आदर्श प्राथमिक शाळा, नांदगाव येथे आज रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री साळुंके सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली व श्री जाधव सर व शिरसाठ साठी यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मुलांना माहिती सांगितली व श्री महाले सर यांनी फलक लेखन केले.. आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाषण सादर केले. यावेळी बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाषण केले व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाचा परिचय करून दिला अशा पद्धतीने कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व सूत्रसंचालन श्रीमती. शिंदे मॅडम यांनी केले..
