
*जळगाव निंबायती (वार्ताहर) – अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विषयाचे अध्यापक प्रा. सी. डी. राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, विश्वस्त भिलाजी दुकळे होते. समवेत प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, प्रा. एस. टी. जाधव, पी. यु. शिंदे, प्रा. अमोल अहिरे, योगेश ठोके, सुदय बोरसे, दिपक बोरसे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रसंगी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डी. एस. जमधाडे यांनी केले तर आभार प्रा. प्रशांत देवरे यांनी मानलेत.
