
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९८४ वा दिवस

अज्ञानाच्या काळ्याकुट्ट मेघांनी आपला समस्त देश झाकाळून गेला आहे हे बघून तुमचे हृदय पिळवटून निघते काय? या गोष्टी तुम्हाला अगदी बेचैन करून सोडतात काय? या गोष्टींमुळे तुमची झोप उडून गेली आहे काय? काय ह्या भावना तुमच्या नसानसांतून सळसळत आहेत? तुमच्या अगदी रक्तात भिनल्या आहेत? तुमच्या हृदयस्पंदनांशी एकरूप झाल्या आहेत? त्यांनी तुम्हाला अगदी वेडे करून सोडले आहे? विनाशाच्या या दुःखाने तुम्हाला पूर्णपणे ग्रासून टाकले आहे? आणि ही स्थिती दूर करण्यासाठी तुम्ही आपल्या नावलौकिकावर, आपल्या पत्नीवर, पुत्रांवर, आपल्या धनदौलतीवर, एवढेच नव्हे तर आपल्या शरीरावर देखील पाणी सोडले आहे? हे सारे तुम्ही केले आहे? देशभक्त होण्याची अगदी हीच पहिली पायरी आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १० श्रावण शके १९४७
★ श्रावण शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५
★ १८९९ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी व इंदिरा गांधी यांच्या मातोश्री कमला नेहरू यांचा जन्मदिन.
★ १९२० भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी नेते, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, भागवत गीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन.
★ १९२० लेखक, कवी, समाजसुधारक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती.
