
माणिकपुंज (प्रतिनिधी ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार २१व्या शतकातील चिकित्सक विचार,सर्जनशील विचार,सहयोग,संवाद,आत्मविश्वास व करुणा ही कौशल्य आत्मसात करण्यासाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रप्रमुख राजेंद्र काटकर सर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी (माणिकपुंज)येथे शिक्षणपरिषदेप्रसंगी केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी,मोहितेवाडी व बेलेश्वर वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कासारी केंद्राची शिक्षण परिषद ठाकरवाडी शाळेत मोठ्या उत्साहात पार पडली.

सदर शिक्षण परिषदेत इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकाचा परिचय करून देण्यात आला.कल्पना चव्हाण मॅडम यांनी बालभारती पाठ्यपुस्तकाचा परिचय करून देतांना जुने पुस्तक व नवीन पुस्तक यातील फरक सांगतांना बालवाटिकेतील पूर्वतयारीमुळे इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकाची काठीण्य पातळी वाढविण्यात आली असून क्षमता,अध्ययन निष्पत्ती व कृतींचा क्रम यांची योग्य सांगड उपस्थितांना समजावून दिली. गोकुळ निकम सर यांनी गणित पाठ्यपुस्तकातील मुखपृष्ठावरील कृतीतून गणन,वाटणी,मांडणी, आकार,मापे यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध स्पष्ट करून संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा परिचय करून दिला.तर संजय अगोणे सर यांनी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील कवितेतून कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांचा शब्दभांडार व संभाषण कौशल्य वाढवावे असे सांगितले.सदर शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख राजेंद्र काटकर सर यांनी प्रशासकीय कामकाज आढावा घेऊन अनमोल मार्गदर्शन केले.याप्रसंगी ठाकरवाडीचे सरपंच विष्णूभाऊ मेंगाळ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामा मेंगाळ केंद्रातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.शिक्षण परिषदेसाठी ठाकरवाडी शाळेचे शिक्षक सतीश बिरारी सर, सुरेश बागुल सर,अभिलाष दोडके सर, मोहितेवाडी शाळेचे बाळासाहेब जोरवर सर,निरोप धारगावे सर, बेलेश्वरवस्ती शाळेचे ज्ञानेश्वर सोनवणे सर,प्रीती बिरारी मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
