
मंगळणे (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगळणे ता. नांदगाव येथे, पिलखोड येथील योगेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री. योगेश रमेशशेठ कापडणे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय रमेशशेठ कापडणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले व नाश्ताही दिला तसेच वडिलांची आठवण म्हणून शालेय प्रांगणात वृक्षारोपण केले. पारंपरिक विधीमध्ये अनावश्यक खर्च न करता गरजवंत विद्यार्थ्यांना याच खर्चातून कशी मदत केली जाईल. या हेतूने योगेश कापडणे यांनी दाखविलेल्या दानशूरपणामुळे समाजामध्ये नवीन संदेश जाईल. विद्यार्थ्यांना दिलेल्या या भेटवस्तू बद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवदास साखरे सर यांनी कापडणे परिवाराचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रम प्रसंगी हरिदास पाटील, पंढरीनाथ ताडगे, पंढरीनाथ काकड, श्याम ताडगे, रेखा भोये मॅडम, दादासाहेब रणदिवे सर, भाग्यश्री पवार, विकास काकड हे उपस्थित होते.
