
ताहाराबाद -(प्रतिनिधी )येथील मविप्र संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, ताहाराबाद विद्यालयात विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्युनिअर कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष विलास बापू निकम यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य दिपक डावरे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले .सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष विलासबापू निकम,बी. डी. नंदनसर, डॉ. दिगंबर महाजन,केदाअण्णा निकम,सुरेश महाजन ,पर्यवेक्षक बी. एस.जगताप, मनोहर नंदन आदि उपस्थित होते. विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती सीमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गीतमंचाने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.भारतातील महान शास्त्रज्ञांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.सगळ्यात सुरुवातीला गुलाब पुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक के.एम मोरे यांनी केले. तसेच शिक्षक भाषणातून एस. बी. सोनवणे व विद्यार्थ्यांमधून नव्या खैरनार यांनी विज्ञानाचे तसेच विज्ञान छंद मंडळाचे महत्त्व सांगितले. ज्येष्ठ शिक्षक एस.के निकम यांनी विज्ञान प्रतिज्ञा घेतली. या वेळी छंद मंडळात निवड झालेल्या सर्व सदस्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जितेंद्र बच्छाव यांनी तसेच आभार उपशिक्षक के. जी. अहिरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विज्ञान छंद मंडळाच्या अध्यक्षा व उपशिक्षिका श्रीमती पी.पी माटे, एस.जी. गिरी, राहुल पगार आदींनी प्रयत्न केले.तसेच कार्यक्रमासाठी उपशिक्षक जे. एल. गावित, के. ए.बागुल,के.बी. चव्हाण, आर. जी.संसारे, श्रीमती एस. बी.रौंदळ, एस.आर. दळवी, के. एम. पव
