
कार्यक्रमात बोलताना गीतांजली शैली शैलेंद्र, डॉ स्मिता मालपुरे,विश्वास ठाकूर , मुग्धा लेले,विनायक रानडे, फरझाना मिर्झा,डॉ कैलास कमोद
नाशिक( प्रतिनिधी) : जीवनाचे तत्त्वज्ञान साध्या-सोप्या भाषेत मांडणारे आणि मानवी भाव-भावनांना स्पर्श करणारे गीतकार शैलेंद्र यांची गीते आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अशा या महान गीतकारांच्या सर्जनशीलतेचा आढावा घेणारा ‘दिल की नजर से’ हा दृक-श्राव्य कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला.हा कार्यक्रम मुग्धा लेले यांनी सादर केला. विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा जलालपूर (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास बँक डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम पार पडला.शैलेंद्र यांच्या गीतलेखनातील आशयगर्भता, कथानकाला सुसंगत भाव आणि पडद्यावरील प्रसंगांचे नेमके चित्रण या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंची प्रभावी मांडणी मुग्धा लेले यांनी केली. बसंत बहारमधील ‘जा जा रे जा बालमवा’, ‘चलत मुसाफिर मोह लिया रे’, ‘कैसे दिन बीते’, ‘बनाके जिन्दगानियां बिगाड ने से क्या मिला’, ‘आ अब लौट चले’, ‘तूने तो सबको राह दिखाई’ या निवडक गीतांच्या माध्यमातून शैलेंद्र यांच्या गीतलेखनाची अनोखी जादू रसिकांसमोर उलगडली.या प्रसंगी शैलेंद्र यांची सून गीतांजली शैली शैलेंद्र यांची प्रमुख उपस्थिती त्यांनी गीतकार शैलेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. शब्दांचा प्रभावी वापर कथानकाला सुसंगत भाव यांचे मिश्रण यातून त्यांचे गीत आकार घेत असे. पडद्यावरील प्रसंगाची नेमकी नस आपल्या गीतांतून ते पकडत असत. राज कपूर यांच्या अनेक चित्रपटांच्या यशाचे श्रेय शैलेंद्र यांच्या गीतांनाही असे.गीतांजली म्हणाल्या.कार्यक्रमाला सेलिब्रिटी फरझाना मिर्झा, डॉ. कैलास कमोद, विनायक रानडे, डॉ. मनोज शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर म्हणाले, “जुन्या सिनेमातील गाणी आणि अभिनयाचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. त्याची प्रचिती या कार्यक्रमातून सर्वांना आली.”सदर कार्यक्रमास विश्वास को-ऑप. बँक लि., महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) शाखा जलालपूर, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ आणि ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमांचे सहकार्य लाभले.
