
सोनांबे (प्रतिनिधी )शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवृत्ती साबळे मामांचा आदर्श घ्यावा – नंदू पाटील पवार यांचे प्रतिपादनशालेय कामकाजात शिक्षकेतर कर्मचारी पाठीचा कणा असतो बदलत्या शैक्षणिक परिस्थितीतही शिक्षकेतर कर्मचारी महत्वाचा आहे.

.शिस्त,प्रामाणिकपणा,कामाची तळमळ असणाऱ्या निवृत्ती साबळे मामांचा आदर्श शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन सोनांबे जनता विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी केले.ते विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ शिपाई निवृत्ती साबळे यांच्या सेवा पूर्ती कार्यक्रमात बोलत होते

.अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे होतेशालेय समिती सदस्य केरु पवार,संतोष पवार,गुरुवर्य बी एम पवार सर,गोवर्धन पतसंस्थेचे चेअरमन शरद रत्नाकर सर,भाऊसाहेब सखाराम पवार,बी टी नवले, शिवडे विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर,तानाजी पवार,अनिल अण्णा पवार,पर्यवेक्षक दिगंबर जाधव,नितीन पवार,हिरामण शिंदे,दत्ता नाना लोंढे,कृष्णा भोसले,निवृत्ती साबळे,सौ संगीता साबळे आदी मंचावर उपस्थित होते.निवृत्ती साबळे यांनी एकूण ३० वर्ष सेवा केली त्यापैकी सलग २२ वर्षे त्यांनी स्वतःच्या सोनांबे गावात प्रामाणिकपणे सेवा केली.शालेय कामकाजातील

गोपनीयता,प्रामाणिकपणा,आज्ञाधारकता,समर्पण वृत्ती या गुणांमुळे ते कायम स्मरणात राहतील अशा शब्दात शालेय समितीअध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी निवृत्ती साबळे यांच्या कार्याचा गौरव केला.सेवा पूर्ती हा आयुष्याचा भाग असला तरी निवृत्ती साबळे मामांसारखे कर्मचारी सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांची पोकळी भरून येत नाहीअसे प्रामाणिक, सेवाभावी कर्मचारी शाळेची शान असतात असे गौवोद्गार मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी अध्यक्ष पदावरून बोलतांना काढले.यावेळी विद्यालय परिवाराच्या वतीने निवृत्ती साबळे यांचा सपत्नीक विठ्ठल रुख्मिणी मूर्ती,महावस्त्र देऊन नंदू पाटील पवार यांच्या हस्ते सेवा पूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यालयाच्या गीत मंचाने ईश स्तवन व स्वागतगीत सादर केले.भाऊसाहेब दहिफळे यांनी सत्कार मूर्तींचा परिचय करुन दिला.पर्यवेक्षक दिगंबर जाधव यांनी प्रास्ताविक केले.योगिता शिंदे,जनाबाई सुडके, भारत सातपुते,रावसाहेब रण शेवरे,संदीप पडवळ यांचीही यावेळी भाषणे झाली.निवृत्ती साबळे यांनी विद्यालयासाठी रू ५५५५ चा धनादेश यावेळी सुपूर्द केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी केले.किरण पवार यांनी आभार मानले.यावेळी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
