
नाशिक (, प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे .चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय,मोरवाडी, नाशिक येथे सोमवार दि .28/7/2025नागपंचमी ह्या सणानिमित्त सर्प जागृती अभियानांतर्गत सर्प अभ्यासक सन्मा. विक्रम कडाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले .सापाच्या अनेक जातींची उपयुक्त माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. सापाबद्दल असलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज त्यांनी आपल्या व्याखानातून दूर केले व सर्प दंश झाल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार याचे प्रात्यक्षिक प्रमुख अतिथी व त्यांचे सहकारी अंकित चाफेकर यांनी करून दाखवले. विद्यार्थ्यांनी अनेक शंका विचारल्या व सापाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी,पर्यवेक्षक कीर्तिकुमार गहाणकरी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.पानपाटील डी.एल.यांनी केले व पाहुण्यांचे आभार श्री.गायकवाड जे.एस. यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
