
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९७९ वा दिवस
भारतीयांनी आपल्या देशाच्या बाहेर जाऊन, आपल्या ज्ञानप्रतिभेने, अध्यात्मिकतेने व तत्त्वज्ञानाने जग जिंकले पाहिजे. अध्यात्मिक विचारांनी, वेदांतातील सिद्धांतांनी जगावर विजय मिळवणे याचा अर्थ जीवनदायी सिद्धांताचा प्रचार व प्रसार करणे होय. शतकानुशतके आपण उराशी बाळगलेल्या धर्माच्या नावाखालील शेकडो खुळचट समजुतींचा प्रचार करणे नव्हे. घोर जडवाद व अंधविश्वास हे देशापुढील मोठे धोके आपण टाळले पाहिजे. आपला मेंदू आधुनिक, थोर व उदात्त विचार ग्रहण करण्यासाठी सदैव समर्थ असला पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ५ श्रावण शके १९४७
★ श्रावण शुध्द /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २७ जुलै २०२५
★ १९७५ गांधीवादी नेते, भारतीय राज्यघटना मराठी भाषेत अनुवादित करणारे, खासदार त्र्य. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर यांचा स्मृतीदिन.
★ १९८७ जागतिक किर्तीचे पक्षीतज्ञ, बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संस्थापक, डॉ. सलीम अली यांचा स्मृतीदिन.
★ २०१५ मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
