
मखमलाबाद विद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय समिती सहविचार सभेस मार्गदर्शन करतांना मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व उपस्थित सर्व शालेय समिती सदस्य.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय समितीची सविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्राचार्य संजय डेर्ले यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.प्रास्ताविकात त्यांनी शालेय प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये इयत्ता दहावी,बारावी, स्कॉलरशिप,एन.एम.एम.एस. निकाल तसेच भौतिक सुविधांचा आढावा घेतला.

विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे त्यांची दोन सत्रांमध्ये शाळा घेऊन योग्य नियोजन करण्यात आले.ज्येष्ठ शिक्षक अशोक गावले यांनी मागील इतिवृत्त वाचन केले. मागील विविध विषयावर चर्चा करण्यात आली.या सहविचार सभेत स्टेज समोरील जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे व कार्यक्रमांसाठी हॉल बांधण्याची चर्चा करण्यात आली.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांनी शाळेतील विविध विकासकामांचा आढावा घेतला.शालेय शैक्षणिक व भौतिक सुविधांविषयी चर्चा केली.तसेच त्यांनी स्वातंत्र्य दिन व समाज दिन या दोन्ही कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.प्राचार्य संजय डेर्ले यांना नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व सह्याद्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने “मुख्याध्यापक गुरुजन सन्मान पुरस्कार” मिळाल्याबद्दल सर्व शालेय समितीच्या वतीने मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व माजी नगरसेवक दामोदर मानकर यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला

.सहविचार सभेस माजी नगरसेवक दामोदर मानकर,रामचंद्र अर्जुन काकड सर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,ज्येष्ठ सभासद विश्वनाथ पिंगळे,मधुकर पिंगळे,दिलीपराव पिंगळे,परशराम पिंगळे,साहेबराव पिंगळे,राकाशेठ माळी,अजित ताडगे,चित्रा तांदळे,बाळासाहेब पिंगळे,भाऊसाहेब गवळी,गोरख तिडके,शिवाजी हेंगडे उपस्थित होते.जूनियर कॉलेज प्रमुख विकास थोरात यांनी अहवाल लेखन केले.सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अशोक गावले व आभार प्रदर्शन सोमेश्वर मुळाणे यांनी केले.
