
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९७८ वा दिवस* उच्च जातीच्या व्यक्तीबरोबरच मागास जातीच्या व्यक्ती पासून देखील चांगले असेल ते सर्वकाही घ्या व अंत्यजातीचीही सेवा करून त्यांच्यापासून स्वर्गप्राप्ती करून देणारी विद्या शिका. ज्ञानप्राप्तीसाठी कुणाच्याही पायाशी बसण्याची आपली तयारी असली पाहिजे. ऐतिक किंवा पारमार्थिक जीवनासंबंधीची शिकवण जो कोणी सुयोग्य असेल त्याच्याकडून प्राप्त करून घेतली पाहिजे. व्यापक बनणे, संकुचित क्षेत्रातून बाहेर पडणे, सर्वांशी मिळून-मिसळून राहणे, हळूहळू विश्वाशी एकरूप होणे ही आपली अंतिम ध्येये आहेत.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ४ श्रावण शके १९४७*
★ श्रावण शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २६ जुलै २०२५ ★ अश्वत्थ मारुती पूजन
★ १९५६ इजिप्तच्या सुएज कालव्याचे राष्ट्रीयीकरण ★२००५ मुंबई व उपनगरात २४ तासात ९९५ मिमी. विक्रमी पाऊस झाल्याने महापूर येथून शेकडो लोकांचा बळी गेला होता.
★ १९९९ ऑपरेशन विजय कारगिल विजयदिन
★ सर्व वीर हुतात्म्यांना श्रध्दांजली. “जय हिंद”
