
सौ.सुनिता वाळुंजउत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला विभागअखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे

सौ.आरती सोनवणे नाशिक जिल्हा अध्यक्ष महिला विभागअखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे
ईगतपुरी ( तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर) यांजकडुन— अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष पदी सुप्रसिध्द कवियत्री सौ.सुनिता वाळुंज यांची तर नाशिक महिला जिल्हा अध्यक्ष पदी सौ.आरती सोनवने यांची निवड करण्यात आल्याची घोषणा नुकतीच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद गोरे यांनी केली आहे. हभप. सौ, सुनिताताई विजय वाळुंज या राष्ट्रीय भागवत धर्म परिषदमहिला अध्यक्ष सिन्नर तालुका म्हणुन कार्यरत आहेत.कवयत्री म्हणुन साहित्याचे 37 पुरस्कार प्राप्त आहेत.नुकताच दिल्ली येथीलमहाराष्ट्र सदनातसावित्रीबाई फुले नॅशनल एक्सलन्स लेडी अवार्ड मिळाला आहे.रामकमल लॉन्स त्या संचालिका व समाजसेविका आहेत. तर सौ.आरती सोनवने या परिषदेत सक्रिय असुन शिक्षिका व कवियत्री म्हणुन ही त्या प्रसिद्ध आहेत. सौ.वाळुंज व सौ. सोनवने यांचे निवडीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांचेसह परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी देविदास खडताळे, फुलचंद नागटिळक, नवनाथ अर्जुन पा.गायकर, अमोल कुंभार, माणिकराव गोडसे, बाळासाहेब गिरी, रविद्रं पाटिल, सौ.विदया पाटिल, प्रदिप पाटिल, योगेश जोशी, राजु आतकरी, श्रीराम तोकडे, संजय कान्हव, रमेश मुकणे, देविदास शिरसाट, पुनम राखेचा, बाबासाहेब थोरात, रोहिणी चौधरी, प्रांजल कोकणे आदिसह अनेकानीं स्वागत केले आहे. —
परिषदेच्या कार्याला बळकटी येईल – गायकर*
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद गोरे यांनी उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष पदी सुनिता वाळुंज व नाशिक महिला जिल्हा अध्यक्ष पदी आरती सोनवने यांची सार्थ निवड केली आहे. त्यांच्या रुपाने परिषदेच्या साहित्यिक कामाला आधिकाधिक बळकटी मिळेल. त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
*नवनाथ अर्जुन पा. गायकर**
उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे
