
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९७७ वा दिवस* कोणत्याही कर्माला वा कर्तव्याला शुद्र लेखू नका. मनुष्याची श्रेष्ठता त्याचे कर्म कोणते आहे यावरुन ठरवता कामा नये, तर तो आपली कर्मे कशा रीतीने पार पडतो यावरुनच त्याची श्रेष्ठता ठरविली पाहिजे. अगदी थोड्या वेळात सुंदर आणि टिकाऊ जोडा तयार करणारा एखादा चांभार धंद्याच्या व कामाच्या दृष्टीने, दररोज अर्थशून्य बडबड करणार्या एखाद्या विद्वान पंडितापेक्षा देखील अधिक श्रेष्ठ आहे. प्रत्येक कर्तव्य हे पवित्र असून ‘कर्तव्यनिष्ठा’ वा ‘स्वधर्मनिष्ठा’ हीच सर्वोच्च ईश्वरोपासना होय.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर ३ श्रावण शके १९४७*
★ श्रावण शुध्द /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २५ जुलै २०२५ ★ श्रावण मासारंभ
★ जरा जीवंतीका पूजन
★ १८८० स्वदेशी चळवळीचे प्रणेते, समाजसुधारक, पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका यांचा स्मृतीदिन.
★ १९१९ सुप्रसिध्द गायक, संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचा जन्मदिन.
★ १९९७ के. आर. नारायणन भारताचे दहावे व पहिले दलित(मल्याळम) राष्ट्रपती झाले.
★ २००७ श्रीमती प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी विराजमान.
