
पिंपळगाव बसवंत ( प्रतिनिधी ) जि.प शाळा भाऊनगर येथे दिनांक 22 जुलै 2025 रोजीHAL चे कामगार व कामगार संघटनेचे माजी सदस्य श्री. नितीनभाऊ पगारे यांच्या परिवारातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आले . त्यात एक मोठी वही, चित्रकला वही, रंगपेटी, लेखन साहित्य अशा उपयोगी साहित्याचा समावेशआहे.खरंतर पगारे परिवारावर कोरोना काळात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला घरातील कर्ता मोठा मुलगा कै. श्री . किशोर पगारे यांचे निधन झाले. त्या दुःखातून सावरत मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हे कुटुंब गरीब, गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपताय. आणि या संकल्पनेला सुरुवात केली ती त्यांच्या माऊली सौ. हिराबाई पगारे यांनी . खरचं त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे .आमच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी केलेली मदत खरचं लाखमोलाची आहे . त्याबददल त्या कुटुंबाचे आम्ही मनापासून आभारी आहोत .या कार्यक्रमाला पूर्ण पगारे कुटुंब उपस्थित होते . कुटुंबातील नातवंडांनी ही हा सामाजिक वसा स्वतः अनुभवला .ज्यांच्या प्रयत्नाने ही मदत आमच्या विद्यार्थ्यांना मिळाली असे देवीचा माथा शाळेचे मुख्याध्यापक श्री . देवेंद्र वाघ सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य हे पण कार्यक्रमास उपस्थित होते . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता निखाडे मॅडम यांच्या हस्ते शाळेच्या वतीने सगळ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षिका श्रीम. नंदा बरडे, श्रीम. प्रियंका बच्छाव, श्रीम. रजनी दशपुते, श्रीम. अलका सगळे, श्रीम. सुनंदा पवार, श्रीम सोनाली पाटील सौ अंजली पिंगळ यांनीसहकार्य केले .
