
पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयात लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर…

पिंपळगाव बसवंत. (प्रतिनिधी ):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयात लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय डेर्ले, जेष्ठ शिक्षिका श्रीम डंबाळे मॅडम, श्रीम कदम मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आजचा हा कार्यक्रम इयत्ता आठवी ( क ) च्या विद्यार्थ्यांनी सादर केला. विध्यार्थी मनोगत आयुष कदम, सुदर्शन रकिबे, तुषार जोशी, यांनी व शिक्षक मनोगत श्रीम जाधव एस.पी यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळक यांची वेशभूषा कुमार तुषार जोशी याने सादर केली. अध्यक्षीय मनोगतात विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते म्हणून ख्यातनाम आहेत.बाळ गंगाधर टिळक भारतीय क्रांतिकारी,शिक्षक,सामाजिक कार्यकर्ता,वकील व भारतीय स्वातंत्र्य सेनानी देखील होते.तशेच भारताला स्वतंत्रता मिळवून देण्यासाठी आपले बलिदान देणारे चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी च्या विद्यार्थिनी संस्कृती मोरे व वैष्णवी पानसरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर असे फलक लेखन विद्यालयातील कला शिक्षक अनिल शिरसाठ यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
