
मखमलाबाद विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले, जूनियर कॉलेज प्रमुख प्रा. विकास थोरात,ज्येष्ठ शिक्षक प्रताप काळे,सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षकवृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले व कु.धनश्री लोखंडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.कु.प्रज्योत ठाकरे याने लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली.ज्येष्ठ शिक्षिका सुनिता उशीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी सांगितले की लोकमान्य टिळक शाळेत असताना घडलेल्या प्रसंगातून त्यांना असत्य आणि अन्याय याबद्दल विलक्षण अशी चीड होती.मनन आणि चिंतनाच्या जोरावर त्यांनी “गीतारहस्य” हा महान ग्रंथ लिहिला.मराठा व केसरी वृत्तपत्र त्यांनी सुरू केले.

तसेच शिवजयंती व गणेशोत्सव सुरू करून भारतीय जनतेच्या मनात देश स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी निर्माण केला.अशा या महान राष्ट्रपुरुषाला शतशः प्रणाम. कु.आराध्या दराडे व कु.अबोली पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षिका बेबी जाधव व कु.यश सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले.इयत्ता ६ वी अ व इयत्ता ९ वी अ च्या या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका संगीता कुशारे,भाग्यशाली जाधव,वैशाली ठाकरे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
