
मखमलाबाद विद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या गुरु-शिष्य पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले व सर्व शिक्षकवृंद

मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या गुरु-शिष्य पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षकवृंद उपस्थित होते. इयत्ता सातवी फ च्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली.ज्येष्ठ शिक्षिका रूपाली शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांनी निफाड तालुका व नाशिक जिल्ह्यातील विविध संस्थांवरती भरीव कार्य केले आहे. सहकार,शैक्षणिक,राजकीय या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचे कार्य म्हणजे मोलाचे योगदान आहे. कर्मवीरांनी केलेल्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे अभिवादन करण्यात आले.या दोन्ही समाजधुरीनांचे कार्य निरंतर चालत आलेले असून शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक विकास या कर्मवीरांमुळेच झाला असेही त्यांनी शेवटी सांगितले.इयत्ता सातवी फ च्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका रूपाली शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
