
नांदगाव – मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांची गुरु शिष्य पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे व पर्यवेक्षक अविनाश शेवाळे , जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड, विजय देशमुख यांनी गुरु शिष्य प्रतिमेचे पूजन केले. उपशिक्षिका गवळी जया यांनी गुरु – कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली. बहुजनांच्या मुलांकरता शिक्षणाची गंगोत्री यांनी खेड्या- पाड्यांमध्ये पोहोचवली. शिष्य – सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या विषयी बोलताना शिक्षण, शेती व कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा कार्याचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सामाजिक काम केले. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या मनोगतात कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांची गुरु- शिष्य जोडी जिल्ह्यात आदर्श व्रत जोडी आहे. गुरु शिष्यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा या संयुक्त पुण्यतिथी साजरी करण्याचा उद्देश आहे हे सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक योगेश खालकर यांनी केले.
