
चांदवड (प्रतिनिधी ) चांदवड जि. नाशिक येथे खानदेश (नाशिक)विभागीय अधिवेशन रेणूका मंदिरातील सभागृहात भरगच्च गर्दीत संपन्न झाले. नाशिक, नंदुरबार, धुळे,जळगाव, अहिल्यानगर या पाच जिल्ह्य़ातील जिल्हाअध्यक्ष, तालुकाअध्यक्ष, राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व सेवानिवृत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी विभागीय अध्यक्ष दादासाहेब काकळीज यानी सर्व प्रश्न माडले व राज्य अध्यक्ष मधुकर जंगम यानी त्यास समर्पक उत्तरे दिली व संघटनेने आज पर्यंत सोडविलेले प्रश्न यावेळी सांगितले.सभागृहातील संघटनेचे सभासद यानी उत्स्फूर्तपणे “मधुकर जंगम तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” या घोषणानी सभागृह दणाणून सोडले.सर्व पदाधिकारी यांचा सत्कार यावेळी करणेत आला.

पेन्शन विक्री, ग्रॅज्युएटी, 7 वा वेतन आयोग हप्ते, संगणक वसुली, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षणविस्तार अधिकारी या पदोन्नत वेतनवाढ,पुरस्कार वेतनवाढ, अत्युत्कृष्ठ कामे वेतनवाढ, निवडश्रेणी, 10-20-30 योजना, केंद्रप्रमुख फिरती भत्ता1650, रजा रोखीकरण, कोर्ट केसेस,जि.प. स्तरावरील प्रश्न सुटण्यासाठी जि.प.शिक्षण कमिटीत सेवानिवृतांचा प्रतिनिधी घेणे,राज्य स्तरावरुन निधी आणण्यासाठी राज्यअध्यक्ष याना राज्यपाल नियुक्त आमदारपदी घ्यावे किंवा एखादे महामंडळ द्यावे.यासह सर्व मुद्द्यांची चर्चा येथे झाली.यावेळी जिल्हाअध्यक्ष डी. के. नाईक, भगवान सोनवणे,दिलीप दहिफळे, भगवान वाघ, नानासाहेब बोरसे, भावडू गिरासे यांचेसह पुणे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब आडके व राज्य प्रतिनिधी उपस्थित होते.
