
मखमलाबाद विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले यांना मुख्याध्यापक गुरुजन सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व मान्यवर.
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबादचे मुख्याध्यापक संजय डेर्ले यांना “मुख्याध्यापक गुरुजन सन्मान पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व सह्याद्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सव अंतर्गत मुख्याध्यापक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील गुणवंत, आदर्श,कार्यक्षम अशा ६५ मुख्याध्यापकांना यावेळी गौरविण्यात आले.सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉ.संजय चावला यांच्या शुभहस्ते प्राचार्य संजय डेर्ले यांना “मुख्याध्यापक गुरुजन सन्मान” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच नाशिक शहर मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे सचिव एस.बी.देशमुख यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यानिमित्त मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांच्या शुभहस्ते त्यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मखमलाबाद विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच म्हसरूळ अभिनवचे मुख्याध्यापक संतोष उशीर यांनीही त्यांचा सत्कार केला.प्राचार्य संजय डेर्ले यांना “मुख्याध्यापक गुरुजन सन्मान” पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,मविप्र अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,संचालक रमेश आबा पिंगळे,संचालक ॲड.लक्ष्मणराव लांडगे,माजी सेवक संचालक डॉ.अशोकराव पिंगळे,शिक्षणाधिकारी डॉ.भास्करराव ढोके,उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष पंडितराव पिंगळे,अभिनव शालेय समिती अध्यक्ष निवृत्ती महाले,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन स्कूल कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,शालेय समिती सदस्य,मविप्र सभासद,ग्रामस्थ,सर्व प्राध्यापक,शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष अभिनंदन केले
