
सिन्नर (प्रतिनिधी )१८ जुलै २०२५ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व जागतिक आदिवासी नेता नेल्सन मंडेला यांच्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व नेल्सन मंडेला यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांनी दलित आणि माहाराष्ट्रातील ग्रामीण लोकांच्या जीवनावर आधारित साहित्य निर्माण केले.

त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सक्रिय भूमिका बजावली.त्यांनी कथा, कादंबन्या, लावणी, पोवाडे लिहून मराठी साहित्यात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या लेखनीतून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली, ज्यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले. ते लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म अस्पृश्य मांग समाजात झाला.त्यांना जातीव्यवस्था, गरीबी आणि भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवसातच शाळा सोडली त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. असे ते म्हणाले.*विजय मुठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की* संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे.तसचे नेल्सन मंडेला यांना आफ्रिकेतील लोकशाहीचे जनक मानले जाते.दक्षिण आफ्रिकेत गोरा काळा रंगावरून भेदभाव केला जात असे.त्या विरूद्ध आवाज उठवून भेदभाव नाहीसा होण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली व संघर्ष केला.तर *रुपेश मुठे म्हणाले की* नेल्सन मंडेला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले.नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधी यांना प्रेरणास्थान मानून त्यांनी सत्य अहिंसेची जोपासना केली. लोक त्यांना राष्ट्रपिता म्हणत असत.नोव्हेंबर २००९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने रंगभेद विरोधी त्यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेतली व त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस १८ जुलै हा “मंडेला दिवस” म्हणून घोषित केला.त्यांना त्यांच्या कामगिरी बद्दल जगातील अनेक देशांनी संस्थांनी सन्मान व पुरस्कार दिले.प्रा.हरी नरके यांनी महात्मा फुले यांचं गुलामगिरी हे पुस्तक नेल्सन मंडेला यांना भेट दिलं आहे.अशा महान लोकशाहीर अण्णाभाऊ व नेल्सन मंडेला यांना विनम्र अभिवादन!*या कार्यक्रमाचे सुञसंचलन दिनेश लोंढे यांनी केले प्रास्ताविक विजय मुठे तर आभार बाळनाथ कार्ले यांनी मानले*यावेळी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, बाळासाहेब मुठे, बाळनाथ कार्ले,दिनेश लोंढे, मनोज लोणारे ,सुनिल गुरकुले, शरद जाधव, मुना गुंजाळ आदी उपस्थित होते.
