

मसाप शाखा नाशिकरोड आयोजित ‘शिवयुगाची स्मरणगाथा’ कार्यक्रमात दीप प्रज्वलन करताना मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे. समवेत सरदार विक्रम पेठे, सोपान वाटपाडे, दिनकर दांडेकर, शिवाजी म्हस्के: !


नाशिकरोड:(प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोडने ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनापासून ४००व्या शिवजन्मोत्सवापर्यंत सुरू केलेल्या 'शिवयुगाची स्मरणगाथा' मालिकेच्या द्वितीय वर्षी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचे सादरीकरण केले. साहित्य रसिकांनी नाशिकरोडचे ऋतुरंग अँफिथिएटर भरगच्च भरले होते. शालेय विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस पोवाडे आणि शौर्यगीतांच्या सादरीकरणातून शिवरायांची शौर्यगाथा उलगडली. 'मसाप'चे जिल्हा प्रतिनिधी तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे अध्यक्षस्थानी होते.शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात मविप्र संस्थेच्या अग्रगण्य मराठा हायस्कूलच्या साठ विद्यार्थ्यांनी संगीतशिक्षक दिनकर दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवगर्जना, शिवजन्माचा पोवाडा, महाराष्ट्र भूमी बहुगुणी, शिवशौर्य अर्थात अफजलखान वध पोवाडा, शिवरायांची आगऱ्याहून सुटका पोवाडा, चमके शिवबाची तलवार, गिरी शिखरी किरीटापरी, जय हो राजे शिवाजी, दैवत छत्रपती, शिवरायांची आरतीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या चरित्राची शौर्यगाथा सादर करत रसिकांच्या डोळ्यासमोर शौर्य आणि शिवकाळाचा जाज्वल्य इतिहास उभा केला. साई बोराडे (ढोलकी), उत्कर्ष निकुंभ (तबला), विराज दांडेकर (संबळ आणि ढोलकी), अथर्व शिंदे (तुणतुणे), कार्तिक आढाव, कुणाल नांद्रे (टाळ आणि झांजरी), पराग जोशी (ध्वनिसंयोजन) यांच्यासह दिनकर दांडेकर यांनी संगीत संयोजन आणि हार्मोनियम साथ करत ही अनोखी शौर्यगाथा अधिक रंगतदार केली. श्रावणी आवटे आणि गौरी खुटे यांनी निवेदन केले. स्वराज्याचे मानकरी सरदार त्र्यंबकरावमामा पेठे यांचे नववे वंशज डॉ. चंद्रशेखर पेठे यांचा सन्मान मिलिंद गांधी यांनी तर शिवसाहित्यिक सोपान वाटपाडे यांचा सन्मान बाळासाहेब गणोरे यांच्या हस्ते करण्यात आला. दोन्ही सन्मानार्थींनी सत्काराला उत्तर दिले. दशरथ लोखंडे, अलका अमृतकर, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश वसंत पाटील आणि योगिता मिंदे यांनी विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह देऊन कौतुक केले. वृंदा देशमुख यांच्या स्वागतकाव्याने कार्यक्रमास सुरुवात झाली. शिवाजी म्हस्के यांनी प्रास्ताविक केले. गीता पाटील यांनी सरदार पेठे यांचा कार्यपरिचय करून दिला. कांचन बोराडे आणि मंगला सातभाई यांनी अतिथींचा परिचय करून दिला. ॲड. वर्षा देशमुख आणि कांचन पवार यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. चंद्रकांत गुरव यांनी आभार मानले. संतोष हुदलीकर आणि रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास सरदार विक्रम पेठे, सरदार अमित पेठे, नंदन रहाणे, प्रशांत कापसे, पांडुरंग चव्हाण, राजेंद्र सोमवंशी, अरुण सावंत, रेखा पाटील, सुरेखा गणोरे, अनिल खालकर, योगेश कापडणीस, डॉ.सुधीर ठोसर, नामदेव पाटील, प्रभाकर होनराव, डॉ.सम्राट मोरे, आत्माराम शिंदे, बाळासाहेब शिंदे, अनिल खालकर, वीणा काळे, मंगल जाधव, नामदेव गाढवे पाटील, गंगाधर कोरडे, नरेंद्र डेर्ले, मंगल सावंत, सीमा पाटील, सरोज खालकर, रेखा देशमाने, शितल हांडोरे, रूपाली जाधव, गणेश मोरे, हेमंत भट, राजेंद्र शिंदे आदी साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
