
मोहाडी : (बातमीदार) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मोहाडी येथील थोरात विद्यालयात हरितकुंभ २०२५-२७ संकल्पने अंतर्गत हरित सेनेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे सामाजिक वनीकरण विभाग, दिंडोरीचे श्री पोपट डांगे साहेब व श्री मोहन पवार साहेब सह दिंडोरी पेठ मविप्र संचालक श्री प्रवीण नाना जाधव मोहाडी गावच्या सरपंच सौ आशाताई लहांगे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले *”माझा कुंभ* *माझी* *जबावदारी”* , *”माझा वृक्ष* – *माझी जबाबदारी”* विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शालेय परिसर दुमदुमला होता कार्यक्रमास माध्यमिक शालेय समिती श्री सुरेश सोमवंशी,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष श्री विजय जाधव अभिनव बालविकास मंदिर शालेय समिती अध्यक्ष श्री रामराव पाटील,श्री उत्तम काका जाधव, श्री एल टी पाटील गुरुजी सर्व शालेय समिती सदस्य, प्राचार्या शरयू भामरे ,पर्यवेक्षक रविंद्र निकम अभिनव मुख्याध्यापक सोनाली देशमुख हरित सेना प्रमुख उल्केश भोसले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समिती व हरित सेनेतर्फे करण्यात आले
