
नांदगाव -(प्रतिनिधी )मविप्र संचलित आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव विद्यालयात कर्मवीर गणपतदादा मोरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या प्रतिमेच पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री ए.पी साळुंके सर, व सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यालयातील उपशिक्षक श्री शिरसाठ सर यांनी कर्मवीर गणपत दादा मोरे यांचा कार्याचा परिचय करून देताना दादांनी आयुष्यभर शिक्षण ,शेती, श्रमसंस्कार ,सामाजिक न्याय या हक्कासाठी अखंड संघर्ष केला. शिक्षण हे फक्त पुस्तकी न राहता ते जीवनाला दिशा देणार असावं अशी कर्मवीर दादांची धारणा होती. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री साळुंके सर व प्रमुख पाहुणे श्री परशराम पुंड प्राचार्य बिटको कॉलेज नाशिक व श्री विजय धामणे पत्रकार बंधू यांनी आपल्या मनोगततूनशेवटी कर्मवीर गणपत दादा मोरे हे केवळ एक व्यक्ती नव्हते ,तर ती एक संकल्पना होती-संघर्षाची, शिक्षणाची आणि सामाजिक जागृतीची. असे प्रतिपादन केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते…
