
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९७१ वा दिवस* एखाद्या उदात्त आदर्शाभोवती एकत्रितपणे विचार करून आपले अपेक्षित ध्येय गाठण्याचे मार्ग निश्चित केले जातात. त्यासाठी आपली जेवढी शक्ती लावली जाईल त्या प्रमाणात आपणास यश निश्चित प्राप्त होईल. यात शंका नाही. ज्या देशातील सर्वसाधारण जनतेत शिक्षण, विद्या, समाजशक्ती, समानता, यांची जितकी वाढ होते, तितक्या प्रमाणात तो देश उन्नत व प्रगत होतो. सर्वसाधारण जनतेत विद्येचा प्रचार केला पाहिजे. शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. राष्ट्रनिर्मितीचा हाच एकमेव उपाय आहे.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
**★ भारतीय सौर २८ आषाढ शके १९४७*
★ आषाढ वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १९ जुलै २०२५ ★ नक्षत्र – सूर्य पुष्य वाहन – मोर
★ १८२७ क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्मदिन.
★ १९३८ भारतातील सुप्रसिध्द खगोलशास्त्र डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्मदिन.
★ १९६९ पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.
