
नाशिक (प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद सोसायटीचे श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, मोरवाडी, नाशिक येथे *हरित कुंभ अंतर्गत वृक्षारोपण* कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. सोनाली संपत देशमुख (वनपाल सामाजिक वनीकरण नाशिक) उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या व शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. माळी मॅडम, पर्यवेक्षक श्री.गहानकरी सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. “माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारी” या घोषवाक्याचा जयघोष करून विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी वृक्ष संवर्धना विषयी मार्गदर्शन केले. हरितसेनेचे शिक्षक श्री. गायकवाड सर यांनी पाहुण्यांचे आभार मानले. हरित सेनेतील सर्व सभासदांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदवला. अशाप्रकारे मोठ्या उत्साहात हरित कुंभ अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
