
सिन्नर (प्रतिनिधी,) संभाजी ब्रिगेडचे नेते मा. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सिन्नर येथे छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरवादी चळवळींच्या वतीने निवेदन संभाजी ब्रिगेडचे नेते मा. प्रविणदादा गायकवाड यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगार असलेल्या सर्वच गुन्हेगारांना मकोका लावण्यात यावा आणि संविधानविरोधी, लोकशाही विरोधी, कडव्या उजव्या जातीवादी ब्राम्हणवादी शक्तींच्या विरोधात व्यक्ती, संघटना बंदीचा कायदा निर्माण करून जनतेला सुरक्षा देण्यात यावी. यांसारख्या विविध मागण्यांसाठी सिन्नर येथे छत्रपती, फुले,शाहू, आंबेडकरवादी चळवळींच्या वतीने निवेदन देण्यात आले.अलीकडील काळात महाराष्ट्रभरात सराईत गुन्हेगार मोकाट सुटलेले असून सर्वसामान्यांपासून बुध्दीजीवी, विद्वान व अनेक सामाजीक चळवळींच्या नेत्यांना त्यांचा त्रास सुरु आहे. चित्रलेखाचे संपादक राहिलेले ज्ञानेश महाराव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता प्रविणदादा गायकवाड यांच्यावरदेखील प्राणघातक हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये लोकशाही विरोधी, संविधान विरोधी, कडव्या उजव्या जातीवादी ब्राह्मणवादी शक्तींचा हात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शांतता व सुरक्षतेला धोका निर्माण झाला आहे. तरी अनेक जिल्ह्यांवर साखळीने पसरलेल्या या सराईत गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा त्यांना अटक करण्यात यावी. प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्वच सराईत गुन्हेगारांना मकोका लावण्यात यावा. अशी मागणी निवेदन देताना करण्यात आल्या
1) संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वच सराईत आरोपींवर मकोका लावून, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी
2) संविधान विरोधी, लोकशाही विरोधी, कडव्या, उजव्या, जातीवादी, ब्राम्हणवादी, व्यक्ती, संघटनांच्या विरोधात जनसुरक्षा विधेयकाच्या धर्तीवर कठोर कायदा करून जनतेला सुरक्षा प्रदान करावी
3) महाराष्ट्रभरात पसरलेल्या या संविधान विरोधी, लोकशाही विरोधी, जातीवादी ब्राह्मणवादी संघटनांची मालमत्ता जप्त करण्यात यावी
याप्रसंगी महामित्र परिवार महामित्र दत्ता वायचळे,सिटू परिवार काॅम्रेड हरिभाऊ तांबे संभाजी ब्रिगेड सुभाष कुंभार आनंदा सालमुठे,जिजाऊ ब्रिगेड शिवमती कल्पना रेवगडे, शिवमती अनिता गांडुळे आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, मा.नगरसेवक रुपेशभाऊ मुठे,महात्मा फुले समता परिषद राजेंद्र जगझाप विलास दराडे,सुनिल होळकर, आलुतेदार बलुतेदार महासंघ भाऊसाहेब पवार अंधश्रध्दा निर्मूलन समिती डाॅ.श्याम सुंदरझळके,प्रभाकर चतुर सर मनोज भगत बामसेफ सागर भालेराव सर सचिन गडाख,रंगनाथ बोडके,सुर्यभान नरोटे,भाऊसाहेब रानडे तनवीर शेख लखन पाचोरे आदी उपस्थित होते
