
ओझर: दि.१५ वार्ताहर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात ओझर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री समीर केदार व श्रीमती नीलिमा डोळस यांनी रस्ते वाहतूक व शिस्त याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रारंभी गीतमंचाने प्रमुख अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. शिक्षक नरेंद्र डेरले यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. यावेळी उपनिरीक्षक समीर केदार यांनी विद्यार्थ्यांना रस्ते वाहतुकी संदर्भात घ्यावयाची काळजी या विषयावर अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी मा. उपनिरीक्षक समीर केदार श्रीमती निलीमा डोळस यांचा सत्कार केला. व्यासपीठावर पोलीस कर्मचारी मंगेश कडलग नितीन जाधव मयूर भामरे पर्यवेक्षक दशरथ शिंदे राजेंद्र शिंदे आत्माराम शिंदे क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. आभार पर्यवेक्षक शिंदे यांनी मानले.
